ETV Bharat / state

23 जणांचा बळी घेणाऱ्या 'या' खेकड्यांवर गुन्हे नोंदवा; राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

राष्ट्रवादी युवक काँग्रेसने खेकड्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. जर खेकड्यांवर गुन्हा दाखल करणार नसाल तर खेकड्यांनी धरण फोडले, असे वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यावर गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी हिंगोली राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केली आहे. हे आंदोलन पाहण्यासाठी युवकांनी गर्दी केली होती.

NCP
author img

By

Published : Jul 6, 2019, 3:27 PM IST

हिंगोली- चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण खेकड्याने फोडले, असल्याचा दावा जलसंपदा मंत्री तानाजी सावंत यांनी केला. या दाव्याची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यवतीने खिल्ली उडविण्यात आली. 23 जणांचा बळी घेणारे हेच ते खेकडे आहेत. त्यामुळे यांच्यावर गुन्हा दाखल करा, अन ताबडतोब अटक करा, या मागणीसाठी निवेदन देऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने हिंगोली शहर पोलीस ठाण्यात धाव घेत निषेध नोंदवण्यात आला.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस

तिवरे धरण हे खेकड्यांनी पोखरल्यामुळेच फुटल्याचे ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांचे मत असल्याचा दावा सावंत यांनी केला होता. एवढेच नव्हे तर शिवसेनेचे चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण या घटनेला जबाबदार नसल्याचे सावंत यांनी सांगितले होते. सावंत यांनी चव्हाणांची पाठराखण करत चक्क खेकड्याला जबाबदार धरले.

तानाजी सावंत यांच्या विधानाची संपूर्ण राज्यात खिल्ली उडविली जात असून, ही खिल्ली पोलीस ठाण्यापर्यंत देखील जाऊन पोहोचली. हिंगोलीतील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आरोपी असलेले खेकडे पकडून पोलीस ठाण्यात घेऊन गेले. हेच ते खेकडे आहेत, याच खेकड्यांनी 23 जणांचा बळी घेतला. त्यामुळे या खेकड्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना ताबडतोब अटक करा, या मागणीचे निवेदन देत खेकडे पोलिसांच्या हवाली केले.

Intro:चिपळूण जिल्ह्यातील तिवरे धरण, खेकड्याने फोडले असल्याचा दावा जलसंपदा मंत्री तान्हाजी सावंत यांनी केला. त्यामुळे त्या दाव्याची राष्ट्रवादी काँग्रेसच्यवतीने खिल्ली उडवित, चक्क 23 जणांचा बळी घेणारे हेच ते खेकडे आहेत. त्यामुळे यांच्यावर गुन्हा दाखल करा, अन ताबडतोब अटक करा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने हिंगोली शहर पोलीस ठाण्यात धाव घेत निवेदन देऊन अनोखा निषेध केला.

Body:तिवरे धरण हे खेकड्यानी पोखरल्या मुळेच फुटल्याचा दावा ग्रामस्थ अन अधिकाऱ्यांचे मत असल्याचा दावा सावंत यांनी केला. एवढेच नव्हे तर चिपळूण चे शिवसेना आमदार सदानंद चव्हाण या घटनेला जबाबदार नसल्याचे सांगत सावंत यांने चव्हाणची पाठराखण करत चक्क खेकड्याला जबाबदार धरले. सावंत यांच्या विधाने संपुर्ण राज्यात खिल्ली उडविली असून, ही खिल्ली पोलीस ठाण्यापर्यन्त देखील जाऊन पोहोचली. धरण फोडण्यास जबाबदार असलेले खेकडे शोधण्यासाठी कार्यकर्त्यांनी हिंगोलीतील नदी नाले पायाखाली घातले. अन आरोपी असलेले खेकडे पकडून पोलीस ठाण्यात घेऊन गेले. हेच तेथे खेकडे आहेत, याच खेकडयानी 23 जणांचा बळी घेतला. त्यामुळे या खेकड्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना ताबडतोब अटक करा या मागणीचे निवेदन देत खेकडे पोलिसांच्या हवाली केले.

Conclusion:राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे हे आंदोलन पाहण्यासाठी बरेच जण उत्सुक होते. कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात येऊन आणलेले खेकडे ते ठाण्यात सोडण्याचा प्रयत्न करत होते त्यामुळे कर्मचारी चांगलेच गोंधळ गेल्याचे दिसून आले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.