ETV Bharat / state

कोरोना जनजागृतीसाठी सरसावला हिंगोली पशुसंवर्धन विभाग

author img

By

Published : Jul 26, 2020, 2:52 PM IST

कोरोना जनजागृती करण्यासाठी आता हिंगोलीचा पशुसंवर्धन विभागही पुढे सरसावला आहे. पशुसंवर्धन विभागाच्यावतीने येहेळगाव येथील पशुवैद्यकीय रुग्णालया अंतर्गत येणाऱ्या गावात डॉक्टरांनी बोलक्या भिंती बनवल्या. गावातील भीतींवर कोरोनापासून काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणी लिहिण्यात आल्या आहेत.

Awareness
जनजागृती

हिंगोली - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. कोरोना नियंत्रित करण्यासाठी आणि नागरिकांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. कोरोना जनजागृती करण्यासाठी आता हिंगोलीचा पशुसंवर्धन विभागही पुढे सरसावला आहे. पशुसंवर्धन विभागाच्यावतीने येहेळगाव येथील पशुवैद्यकीय रुग्णालया अंतर्गत येणाऱ्या गावात डॉक्टरांनी बोलक्या भिंती बनवल्या. गावातील भीतींवर कोरोनापासून काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणी लिहिण्यात आल्या आहेत.

पशुसंवर्धन विभागाच्यावतीने येहेळगाव येथील भिंतीवर जनजागृतीसाठी म्हणी लिहिण्यात आल्या

कोरोनाचा समूह संसर्ग होण्यास सुरुवात झाली आहे हे रॅपिड अँटीजेन टेस्टमधून आता स्पष्ट होत आहे. एकाच भागात एकाचवेळी 20 ते 25 रूग्ण आढळून येत असल्याने, सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, अजूनही अनेकजण कोरोनाला गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोरोनाबाधित आढळलेल्या भागात आरोग्य विभागाच्यावतीने जनजागृती फलक लावले जात आहेत. सामान्य लोकांना समजेल अशा भाषेत कोरोनाबाबतची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचवल्यास त्यांना लवकर समजेल, असा विचार प्रशासनाने केला आहे.

हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रवीण कुमार घुले, पशुसंवर्धन डॉ. लक्ष्मण पवार, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. संदीप नरवाडे, डॉ. नूर यांच्या मार्गदर्शनाखाली औंढा नागनाथ तालुक्यातील येहळेगाव येथील डॉ. के. एन. राऊत यांनी गावात बोलक्या भिंती केल्या आहेत. याला सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांनी देखील सहकार्य केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.