ETV Bharat / state

हिंगोलीत मृगनक्षत्राच्या दिवशीच पावसाची दमदार हजेरी; अनेक घरांचे नुकसान

हिंगोली जिल्ह्यात सलग ३ ते ४ दिवसांपासून पाऊस पडत आहे. गुरुवारी रात्रीपासूनच पहाटेपर्यंत एक सारखा विजेच्या कडकडाटासह पावसाचा जोर कायम होता.

पाऊसामुळे घरावरची उडालेली पत्रे
author img

By

Published : Jun 7, 2019, 11:30 AM IST

हिंगोली - जिल्ह्यात ६ जूनच्या रात्रीपासून मेघगर्जनेसह पावसाने जोरदार हजेरी लावली. मृगनक्षत्राच्या दिवशीही पहाटेपर्यंत पाऊस सुरूच होता. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून खरीप पेरणीपूर्व शेती मशागतीला वेग येणार आहे.

पाऊसामुळे झालेले नुकसान

जिल्ह्यात सलग ३ ते ४ दिवसांपासून पाऊस पडत आहे. गुरुवारी रात्रीपासूनच पहाटेपर्यंत एक सारखा विजेच्या कडकडाटासह पावसाचा जोर कायम होता. सोसाट्याच्या वार्‍यामुळे जिल्ह्यातील अनेक भागात विद्युत खांब वाकले. तसेच जागोजागी झाडे उन्मळून पडली आहेत.

जिल्ह्यातील गोजेगाव येथे घरांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. घरावरील आणि गोठ्यांवरील टिनांची पत्रे उडून गेल्याने अनेकजण जखमी झाले, तर गुरांनाही मार लागला आहे. तसेच पेडगाव वाडी परिसरात विज पडून एक बैल दगावला आहे. वादळामुळे विद्युत पुरवठाही खंडीत झाला होता.

Intro:

हिंगोली - जिल्ह्यात यंदा दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा सामना करावा लागला. हवामान खात्याने अंदाज लावल्याप्रमाणे ७ जून ला मृगणक्षत्रच्या दिवशी रात्रीपासूनच मेघगर्जनेसह जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे आता शेतकऱ्यांच्या आशा पालवीत झाल्या असून, खरीप पेरणीपूर्व शेती मशागतीला वेग येणार आहे. तर वादळी वाऱ्यामुळे अनेक गावात घरावरील टिनपत्रे उडून गेली.

Body:जिल्ह्यात सलग तीन ते चार दिवसापासून पाऊस हजेरी लावत आहे. गुरुवारी रात्रीपासूनच पहाटेपर्यंत एक सारखा विजेच्या कडकडाटासह पावसचा जोर कायम होता. सुसाट वार्‍यामुळे जिल्ह्यातील अनेक भागात विद्युत खांब वाकले, तसेच जागोजागी झाडे उन्मळून पडली. हिंगोली जिल्ह्यातील गोजेगाव येथे सर्वाधिक नुकसान झाले आहे. घरावरील व गोठ्यावरील टिनपत्रे उडून गेल्याने अनेक महिला व पुरुष गंभीर जखमी होऊन, गुरांना ही मार लागला आहे. वीजपुरवठा बंद झाल्याने गावात कोणाचा कुणाला ताळमेळ नव्हता. त्यामुळे गोजेगाव पहाटे आप आपले पत्र शोधण्यासाठी नागरिकांनी शोधमोहीम सुरू केली. Conclusion:यामध्ये बऱ्याच जनांचे टिन पत्र सापडलेले नव्हते. तर पहिल्याच पावसात विधुत वितरण कंपनीचा फज्जा उडाल्याने नागरिकांना विधुत पुरवठा बंदअभावी उकड्याचा त्रास सहन करावा लागला. तर पेडगाव वाडी परिसरात विजपडून एक बैल दगावला.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.