ETV Bharat / state

हिंगोली जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग; शेतकऱ्यांना दिलासा

आज (रविवारी) झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठी दिलासा मिळाला आहे. खरिप पिके धोक्याच्या आली आहेत.

हिंगोलीत जोरदार पाऊस
author img

By

Published : Sep 1, 2019, 11:32 AM IST

हिंगोली - पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील खरिप पिके हातातून जाण्याच्या मार्गावर होती. मात्र, आज (रविवारी) झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दोन तीन दिवसांपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातवरण होते. तसेच काही ठिकाणी पाऊसही पडला होता. मात्र, आज झालेल्या मुसळधार पावसाने सगळीकडे पाणी पाणी करून टाकले.

पोळ्याच्या दिवशी अन् करीच्या दिवशीही पावसाने हजेरी लावली होती. आज, झालेला पावसाने खरिपाची पिके धोक्याबाहेर निघण्याची शक्यता आहे. हिंगोली जिल्ह्यात ३ लाख ८४ हजार हेक्टर खरीप पेरणीचे क्षेत्र असून यापैकी २ लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. उर्वरित क्षेत्रावरही पेरणी झाली आहे. बऱ्याच काळापासून पावसाने उघडीप दिल्याने पिके दुपारच्या वेळी माना टाकीत होते. माळरान जमीनीवरील पिके तर हातची जाण्याच्या मार्गावर होती. मात्र, दोन ते तीन दिवसापासून अधूनमधून पाऊस हजेरी लावत असल्याने, शेतऱ्यांना दिलाचा मिळाला होता. मात्र, आज जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची चिंता दुर झाली आहे.

पहाटे ४ वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली. एरवी सकाळी मॉर्निंग वॉकला येणाऱ्यांची नेहमीच गर्दी असते. मात्र, पावसामुळे अनेकांनी घराबाहेर येणे टाळले. गणोशोत्सवाच्या तोंडावर झालेल्या या पावसामुळे सगळ्यांना दिलास मिळाला आहे

Intro:

हिंगोली- जिल्ह्यात दोन ते तीन दिवसापासून ढगाळ वातावरण निर्माण झालेले आहे. पोळ्याच्या दिवशी अन करीच्या दिवशी पण पावसाने जोरदार हजेरी लावली होती. आज मात्र पावसाचा वेग जोरदार होता. पहाटे-पहाटे पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने आता मात्र खरिपाची पिके धोक्याबाहेर निघण्याची शक्यता आहे.

Body:हिंगोली जिल्ह्यात ३ लाख ८४ हजार हेक्टर खरीप पेरणीचे क्षेत्र असून या पैकी २ लाख हेक्टर वर सोयाबीनची पेरणी झालीय. अन इतर ही खरीप पिकांची उर्वरित हेक्टर वर पेरणी झालीय. पावसाने उघडदीप दिल्याने पीक दुपारच्या वेळी माना टाकीत होते. माळरानाची तर पिके हातची जाण्याच्या मार्गावर ही होती.मात्र दोन ते तीन दिवसापासून अधून मधुन पाऊस हजेरी लावत असल्याने, मात्र हळूहळू पिके धोक्यातुन बाहेर निघत होती. आज मात्र हजेरी लावलेल्या पावसाने पिकांना खरोखरच नवसंजीवनीच मिळालीय. पहाटे ४ वाजेपासून पावसाचा वेग एवढा वाढला होता की, पावसात जवळचे ही काही दिसत नव्हते. एरवी शहरातील विविध मोकळ्या जागेवर मॉर्निंग वाक ला येणाऱ्यांची नेहमीच गर्दी असते.आज मात्र पावसाने त्यांची देखील त्रेधापीट उडविली होती.त्यामुळे बऱ्याच जणांनी आज घराच्या बाहेर पडणेच टाळले. विशेष म्हणजे पहाटे पहाटे जोरदार पावसाने हजेरी लावली असली तरी ही सूर्य निघाल्यानंतर मात्र पाऊस ठण ठण उघडल्याने पहाटे पहाटे जोरदार पाऊस झालाय याची कोणी कल्पनाच करत नव्हते. एका दिवसात सुकून गेलेले रस्ते मात्र पुन्हा चिखलमय झाल्यामुळे पाऊस झाल्याचे दिसून येत होते. असे ही दरवर्षी च गणेशोत्सव काळात पाऊस जोरदार हजेरी लावतो. Conclusion:आज तर हरतालिकाच्या दिवशीच पावसाने जोरदार हजेरी लावलीय. त्यामुळेच भक्तगण अन शेतकऱ्यांचा आनंद खरोखरच द्विगुणित झालाय. आता पहाटे पहाटे हजरी लावलेल्या पावसामुळे निश्चितच उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.