ETV Bharat / state

शाळेच्या वेळेत मुख्यध्यापिका कुलूप लावून गायब; शिक्षक बाहेरच ताटकळत - zp school

भुतडा या शिक्षण विभागाच्या नव्हे, तर आपल्याच मनाने शाळेचा कारभार चालवतात. कधी-कधी तर त्या दिवसभर शाळाच उघडत नाहीत, तर कधी अर्ध्यातूनच शाळेला सुट्टी देतात, अशा तक्रारी येथील शिक्षकांनी केल्या आहेत.

शाळेच्या वेळेत मुख्यध्यापिका कुलूप लावून गायब; शिक्षक बाहेरच ताटकळत
author img

By

Published : Apr 16, 2019, 8:40 AM IST

हिंगोली - विद्यार्थी आणि शिक्षक यांची जराही पर्वा न करता येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिकेने शाळेच्या वेळेत शाळेला कुलूप लावून दांडी मारल्याचा प्रकार समोर आला आहे. आर. एस. भुतडा असे या मुख्याध्यापिकेचे नाव आहे. त्यामुळे शाळेच्या २ शिक्षिका आणि १ कर्मचारी बंद खोलीसमोर ताटकळत बसले होते. शेवटी शाळेची वेळ संपल्यावर त्यांनी आपली उपस्थिती लिखित स्वरुपात गटविकास अधिकाऱ्याकडे दर्शविली.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शाखा क्रमांक २, केंद्र सदर बाजार, हिंगोली येथे आर. एस. भुतडा मुख्यध्यापीका म्हणून कार्यरत आहेत. या शाळेत इयता पहिली ते पाचवी पर्यंत वर्ग आहेत. तर शाळेची वेळ ही १० ते १ अशी आहे. या शाळेची विद्यार्थी संख्या ८५ इतकी आहे. भुतडा या शिक्षण विभागाच्या नव्हे, तर आपल्याच मनाने शाळेचा कारभार चालवतात. कधी-कधी तर त्या दिवसभर शाळाच उघडत नाहीत, तर कधी अर्ध्यातूनच शाळेला सुट्टी देतात, अशा तक्रारी येथील शिक्षकांनी केल्या आहेत. शाळेत विद्यार्थ्यांना खिचडीचे वाटप होत नसल्याचा प्रकारही समोर आला आहे.

Headmistress Lock school gate even in school time
शाळेच्या वेळेत मुख्यध्यापिका कुलूप लावून गायब; शिक्षक बाहेरच ताटकळत

ही शाळा शहराच्या अतीमध्यम भागात असल्याने शाळेसमोर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. मात्र, याबद्दल काहीच विचार न करता मुख्यध्यापीका विद्यार्थ्यांना शाळेच्या अर्ध्या वेळातूनच सुट्टी देतात. येथील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही आपल्या मनाप्रमाणे वागणूक देत असल्याच्याही तक्रार शिक्षकांनी केली आहे. या सर्व प्रकाराकडे शिक्षण विभागाचे मात्र, साफ दुर्लक्ष असल्याचे दिसते.
येथील शिक्षक शोभा श्रीराम भाले, संगीता त्र्यंबक भाले, त्रिरत्न भरत कांबळे हे शिक्षक आणि कर्मचारी गजानन वसंत तायडे हे चौघे शाळेच्या वेळात शाळेत पोहोचले. मात्र, कार्यालयाला कुलुप असल्याने शिक्षकांनी मुख्यधपिकेला फोनवरून संपर्क साधण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, मुख्यध्यापिकेने काहीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शिक्षक शाळेच्या वेळेत कुलूपबंद कार्यालयासमोर ताटकळत उभे होते.
मागील अनेक वर्षांपासून शाळेत हा प्रकार सुरू आहे. अनेकदा शिक्षकांनी वरिष्ठांकडे लिखित कळविले. तरीही याबाबत अद्याप कोणतीही दखल घेतली नाही. शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता हा गंभीर प्रकार मला आजच माहित झाला. लगेच मी या शाळेची चोकशी करण्याच्या सूचना विस्तार अधिकाऱ्याला देतो आणि यावर योग्य ती कारवाई करणार असल्याचे सोनटक्के यांनी सांगितले.

Intro:शासन शिक्षणावर कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. उद्देश हाच की, शिक्षणापासून एकही विध्यार्थी वंचित राहू नये. मात्र एखाद्या शाळेत विध्यार्थी - विध्यार्थ्याची जराही पर्वा न करता आपण नाहीत नाही अन कार्यरत असलेल्या शिक्षकांना ही विद्यार्थ्यांना शिकवू देण्यासाठी वर्गाबाहेरच ताटकळत ठेवत असतील तर आपणास नववल वाटेल. मात्र हो हे सर्व खरे आहे. चक्क मुख्यध्यापिका शाळेच्या वेळात अधून - मधून शाळेला कुलूप लावून दांडी मारतात. आजही असाच प्रकार झाल्याने दोन शिक्षिका अन एक कर्मचारी बंद खोली समोर ताटकळत बसले अन त्यांनी उपस्थिती लिखित स्वरूपात गटविकास अधिकाऱ्याकडे दर्शविली.

Body:एस. आर. भुतडा असे त्या मुख्यध्यापिकेचे नाव आहे. जि. प. प्रा. शाळा. शाखा क्रमांक २ केंद्र सदर बाजार हिंगोली येथे मुख्यदध्यापिका म्हणून कार्यरत आहेत . या शाळेत इयता १ ली ते पाचवी पर्यन्त वर्ग आहेत. तर १० ते १ अशी शाळेची वेळ आहे. विध्यार्थी संख्या ८५ एवढी आहे. मुख्यध्यापिकेच्या कारनाम्यामुळे शिक्षक तर सोडाच विध्यार्थी देखील हैराण होऊन गेलेत भुतडा ह्या शिक्षण विभागाच्या नव्हे, तर आपल्या नियमाने शाळा चालवितात. कधी कधी तर मनात आलंतर दिवसभर शाळा च उघत नाहीत, तर कधी अर्ध्या वेळेत शाळा सोडून देतात. ही शाळा शहराच्या अति मध्यम भागात असल्याने नेहमीच शाळेसमोरून वाहनांची वर्दळ असते. मात्र मुख्यध्यापिका जराही विचार न करता कधी अर्ध्या वेळेतून तर कधी मनात येईल तेव्हा शाळा सोडून देतात. त्यामुळे अपघाताची देखील दाट शक्यता आहे. विषेश म्हणजे येथील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्याना भुतडा ह्या जणू काय कामाला ठेवल्या प्रमाणेच वागणूक देत आल्याच्या तक्रारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी करीत आहेत. तसेच या शाळेत विध्यार्थ्याना खिचडीचे देखील वाटप होत नाही. तसेच विध्यार्थी संख्या देखील रेकॉर्ड ला वाढवून दाखवत बिल उखळले जात असल्याची खळबळ जनक बाब समोर आली आहे. या सर्व प्रकाराकडे मात्र शिक्षण विभागाचे साफ दुर्लक्ष आहे.
सोमवारी नेहमी प्रमाणे शिक्षक, शोभा श्रीराम भाले, संगीता त्र्यंबक भाले, त्रिरत्न भरत कांबळे हे शिक्षक आणि कर्मचारी गजानन वसंत तायडे हे चोघे शाळेच्या वेळात शाळेत पोहोचले. मात्र कार्यालयाला कुलुप असल्याने शिक्षकांनी मुख्यधपिकेला फोनवरून संपर्क साधण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र मुख्यध्यापिकेने काहीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शिक्षक शाळेच्या वेळेत कुलूप बंद कार्यालयासमोर ताटकळत अन वेळ संपली की त्या शिक्षकांनी लिखित अर्जाद्वारे गटविकास अधिकाऱ्यांना उपस्थिती दर्शविली.

Conclusion:हा प्रकार काय नवीन नाही, मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. अनेकदा शिक्षकांनी वरिष्ठांकडे लिखित कळविले तरी ही या मध्ये अद्याप कोणतीही दखल घेतली नाही. तसेच शिक्षकांना उपस्थिती रजिस्टर वर हजेरी देखील टाकू दिल्या जात नसल्याची खंत शिक्षक व्यक्त करीत आहेत. या प्रकाराने मात्र शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. शिक्षकासह विद्यार्थ्यांना एवढा भयंकर त्रास होत असतानाही, शिक्षण विभागाचे मात्र याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांच्याशी संपर्क साधला असता हा गंभीर प्रकार तर मला आजच माहित झाला. लगेच मी या शाळेची चोकशी करण्याच्या सूचना विस्तार अधिकाऱ्याला सूचना देतो अन योग्य ती कारवाई करणार असल्याचे सोनटक्के यांनीं सांगितले.

व्हिज्युअल ftp केले आहेत. ते बातमीत वापरावेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.