ETV Bharat / state

स्वातंत्र्यदिनानिमित्त हिंगोलीत पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण - hingoli

स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री अतुल सावे यांनी ध्वजारोहण केले.

ध्वजारोहण करताना पालकमंत्री
author img

By

Published : Aug 16, 2019, 10:15 AM IST

Updated : Aug 16, 2019, 10:21 AM IST

हिंगोली - येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ७३ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री अतुल सावे यांनी ध्वजारोहण केले. ध्वजारोहण कार्यक्रम आटोपल्यानंतर पालकमंत्री सावे यांनी सर्वप्रथम स्वातंत्र्यसैनिकांची भेट घेऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.

ध्वजारोहण करताना पालकमंत्री


त्यानंतर ध्वजारोहण प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्वच नागरिकांची सावे यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी अनेकांनी आपापल्या अडचणी पालकमंत्र्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होते. त्यावर पालकमंत्री संबंधित विभागाकडे चौकशी करण्याच्या सूचना देत होते.

हिंगोली - येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ७३ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री अतुल सावे यांनी ध्वजारोहण केले. ध्वजारोहण कार्यक्रम आटोपल्यानंतर पालकमंत्री सावे यांनी सर्वप्रथम स्वातंत्र्यसैनिकांची भेट घेऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.

ध्वजारोहण करताना पालकमंत्री


त्यानंतर ध्वजारोहण प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्वच नागरिकांची सावे यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी अनेकांनी आपापल्या अडचणी पालकमंत्र्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होते. त्यावर पालकमंत्री संबंधित विभागाकडे चौकशी करण्याच्या सूचना देत होते.

Intro:हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज स्वातंत्र्यदिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त पालक मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. ध्वजारोहण कार्यक्रम आटोपल्यानंतर पालकमंत्री सावे यांनी सर्वप्रथम स्वातंत्र्यसैनिकांची भेट घेऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या त्यानंतर ध्वजारोहण प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्वच नागरिकांची सावे यांनी भेट घेतली व शुभेच्छा दिल्या यावेळी अनेक जण आपापल्या अडचणी पालकमंत्र्यांना सांगण्याचा प्रयत्न करत होते त्यावर पालकमंत्री संबंधित विभागाकडे चौकशी करण्याच्या सूचना देत असल्याचे पहावयास मिळाले.







Body:यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शिवरानी नरवाडे खा.हेमंत पाटील, आ. तानाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, जिप सीईओ डॉ.एच. पी. तुमोड, पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अपर जिल्हाधिकारी जगदीश मणियार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती. पालकमंत्री स्वातंत्र्यदिनानिमित्त शुभेच्छा देताना म्हटले की मागील दोन वर्षात संपन्न झालेल्या मेक इन इंडिया व मॅग्नेटिक महाराष्ट्र गुतवणूक परिषदेमध्ये वीस कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून अंदाजे 60 लाख रोजगार उपलब्ध होणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले तसेच गेल्या पाच वर्षात एकूण दहा लक्ष 27 हजार सात लघुउद्योग स्थापित झालेत त्यामध्ये 16 हजार 562 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली तर 59.42 लक्ष रोजगार निर्मिती झाली आहे तसेच डिसेंबर 2014 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत राज्यात सर्वात जास्त थेट विदेशी गुंतवणुकीचे प्रस्ताव प्राप्त झालेत देशात एकूण झालेल्या विदेशी गुंतवणुकीत पैकी 30 टक्के गुंतवणूक म्हणजेच तीन लाख 68 हजार कोटींची गुंतवणूक केवळ या महाराष्ट्र राज्यात झाल्याचे सावे यांनी सांगितले. हिंगोलि जिल्ह्या विषयी सांगायचे झाले तर जून आणि जुलै महिन्यात पावसाची सुरुवात चांगली झाली नाही मात्र मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस चांगला झाला असला तरीही वार्षिक सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यात अद्याप पर्यंत केवळ 42 टक्केच पाऊस झालाय अजूनही पावसाला दमदार पावसाची अपेक्षा आहे. अशाच परिस्थितीत जिल्ह्यात खरीप हंगामाचे 3 लाख 67 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली शेतकऱ्याने पेरणीसाठी बियाणे आणि खताची उपलब्धता व्हावी यासाठी योग्य नियोजनही केले होते यावर्षी ई पॉस मशीन द्वारे खताची ऑनलाइन विक्री केली गेली. तर 2 लाख 82 हजार शेतकऱ्यांनी 2 लाख 35 हजार हहेक्टरवरील पीकासाठी सुमारे 90 कोटी रुपयाचा पिक विमा ही शेतकऱ्याने उतरविण्याचे सावे म्हणाले. तर श्री छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत जिल्ह्यातील 66 हजाराहून अधिक शेतकऱ्यांची 267 कोटी रुपयांची कर्जमाफी झालीय. आधी विकास कामे झाल्याचे यावेळी सावे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर विविध मागण्यासाठी उपोषणे सुरू होती त्या उपोषण कर्त्यांची पालकमंत्री सावे यांनी भेट घेत उपोषण कर्त्यांचे म्हणणे ऐकून घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणांमध्ये लक्ष घालण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिलेत. तर जिल्हा पोलीस अधीक्षक व हिरकणी महाराष्ट्राची या योजनेतून उत्कृष्ट उद्योग करणाऱ्या बचत गटांना पालकमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालयाच्यावतीने बचत गटातील महिलांनी 30 हजार कापडी पिशव्यांची शिलाई करून जिल्हाधिकारी कार्यालयात काही कापडी पिशव्या पालकमंत्री व मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात विनामूल्य शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आल्या.


Conclusion:तर हिंगोली शहरातील खुशाल नगर भागातील दारू बंदी करण्याच्या मागणीसाठी महिला चांगलेच आक्रमक झाल्या होत्या अनेकदा पोलिस प्रशासनाकडे तक्रार करूनही काहीच उपयोग झाला नसल्याचे उपोषणासाठी बसलेल्या महिला पालकमंत्र्यांना मोठ्या पोट तिडकीने सांगत होत्या. यामध्ये नगर सेवक अनिता सूर्यतळ यांनी देखील दारूबंदीसाठी अनेकदा पुढाकार घेतल्याचे ही सांगितले. मात्र काहीही केली गेली नाही. त्यामुळे आता आडवी बाटली उभी बाटली याद्वारे त्या भागातील देशी दारूचे दुकान बंद करण्यासाठी मतदान प्रक्रिया घेतली जाणार आहे त्यानंतर तेथील देशी दारू दुकान बंद करण्यासाठी प्रशासन स्तरावर सर्व तोपरी प्रयत्न केले जाणार असल्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी सांगितले. तर महिलांनी नंतर दारूबंदीच्या घोषणा दिल्या. त्यामुळे जिल्हाधिकारी परिसर चांगलाच दणाणून गेला होता.
Last Updated : Aug 16, 2019, 10:21 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.