ETV Bharat / state

हिंगोलीत किरकोळ कारणावरुन गोळीबार; काडतुसे जप्त - aundha nagnath

अजूनही औंढा नागनाथ येथे भीतीचे वातावरण पसरलेले आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

हिंगोलीत किरकोळ कारणावरुन गोळीबार; काडतुसे जप्त
author img

By

Published : May 29, 2019, 2:06 PM IST

हिंगोली - जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादात हवेत गोळीबार केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. या प्रकाराने औंढा नागनाथ येथे खळबळ उडाली असून, एटीएस पथकाने याची गंभीर दखल घेतली. राहूल तायडे यांच्या फिर्यादीवरून औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शाम कदम, गुड्डू बांगर, संतोष गोरे, स्कॉरपीओचा चालक गुलशन असे आरोपीची नावे आहेत. आरोपी (एमएच.12 एनई 4111) क्रमांकाच्या वाहनाने ओंढा नागनाथ येथील हिंगोली- ओंढा रोडवरील सलीम नुरोदिन इनामदार यांच्या किराणा दुकानासमोर बेकायदेशीररित्या हत्यारे बाळगताना आढळून आले. यातून लोखंडी धारदार कता, दोन लोखंडी पाईप, एक जिवंत काडतुस जप्त केले. त्यामनंतर आरोपी सदर वाहनाने पळूनही गेले. नेमके भांडणाचे कारण काय अजून स्पष्ट झाले नाही.

अजूनही औंढा नागनाथ येथे भीतीचे वातावरण पसरलेले आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. मात्र, गुन्हा दाखल होऊ नये म्हणून अनेक राजकीय पक्षांच्या मंडळींनीदेखील यात हस्तक्षेप करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Intro:जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादात हवेत फायरिंग केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी 7 च्या सुमारास घडली. या प्रकाराने ओंढा नागनाथ येथे खळबळ उडाली असून, ए. टी. एस. पथकाने याची गंभीर दखल घेतली. पोउपनी राहूल तायडे यांच्या फिर्यादिवरून ओंढा ना. पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.

Body:शाम कदम, गुड्डू बांगर, संतोष गोरे, स्कॉरपीओचा चालक गुलशन असे आरोपीची नावे आहेत. आरोपी एम. एच. 12 एन. ई. 4111 क्रमांकाच्या वाहनाने जाऊन ओंढा नागनाथ येथे हिंगोली- ओंढा रोडवरील सलीम नुरोदिन इनामदार यांच्या किराणा दुकानासमोर बेकायदेशीर रित्या लोकात दहशद निर्माण व्हावी म्हणून हत्त्यारे बाळगताना आढळून आले. यातून लोखंडी धारदार कता, दोन लोखंडी पाईप, अन एक जिवंत काडतुस जप्त केले. आरोपी सदर वाहनाने पळूनही गेले. नेमकं भांडणाच कारण काय अजून तरी स्पष्ट झाले नाही. मात्र आरोपीने धारदार शस्त्रे घेऊन ओंढा गाठल्यानंतर त्या ठिकाणी मोठी खळबळ उडाली.यामध्ये वेळीच एटीएस पथकाने हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

Conclusion:अजूनही ओंढा ना येथे भीतीचे वातावरण पसरलेले आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. मात्र हा गुन्हा दाखल होऊ नये म्हणून, अनेक राजकीय मंडळी देखील यात हस्तक्षेप करत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. शेवटी आर्मी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

ओंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे व्हिज्युअल ftp करतोय.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.