ETV Bharat / state

करोडो रुपये खर्चून उभारलेले उद्यानाला लागली आग; लाखो रुपयांचे साहित्या जळून खाक - The park caught fire

हिंगोली शहरातील कळमनुरी येथील हुतात्मा स्मारक परिसरात नगर परिषदेच्या वतीने उभारलेल्या उद्यानाला आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे.

fire broke out in a park built at a cost of crores of rupees in Hingoli
करोडो रुपये खर्चून उभारलेले उद्यानाला लागली आग; लाखो रुपयांचे साहित्या जळून खाक
author img

By

Published : Feb 10, 2021, 4:36 PM IST

Updated : Feb 10, 2021, 4:58 PM IST

हिंगोली - कळमनुरी येथे हुतात्मा स्मारक परिसरात नगर परिषदेच्या वतीने करोडो रुपये खर्च करून, तीन ते चार वर्षापूर्वी उद्यायान उभारले आहे. मात्र, ते नागरिकासाठी अजुनी उघडे करण्यात आले नव्हते. शेवटी दोन दिवसांपूर्वी येथे मनसेच्या वतींने बच्चे कंपनीने आंदोलन करून या उद्यानाचे दार उघडे करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावर मुख्याधिकार्‍यांनी दार उघडे करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर कुठे ते आंदोलन मागे घेण्यात आले होते. मात्र, लागलीच दुसऱ्या दिवशी या उद्यानाला अचानक आग लागून यामध्ये लाखो रुपयाचे साहित्य जळून खाक झाल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. मुद्दाम हून ही आग लावल्याचा आरोप नागरिकांतून केला जातोय.

करोडो रुपये खर्चून उभारलेले उद्यानाला लागली आग; लाखो रुपयांचे साहित्या जळून खाक

कळमनुरी येथे नगरपरिषदेच्या वतीने करोडो रुपये खर्च करून भव्य उद्यान उभारण्यात आले होते. मात्र, आजतागायत या उद्यानाची दारे उघडी करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे उद्यानातील खेळणी शोभेच्या वस्तु तर बनल्या होत्या. अजूनही भयानक बाब म्हणजे या ठिकाणी देखरेखीसाठी ठेवण्यात आलेले मजूर साफ-सफाई कडे दुर्लक्ष करत असल्याने उद्यानामध्ये मोठ्या प्रमाणात गवत वाढले होते. मात्र, या गवतामुळे आज अचानक उद्यानात पेट घेतल्याने यामध्ये बच्चेकंपनीसाठी प्रतीक्षा करत असलेले साहित्य जळून खाक झाले आहे. या घटनेने कळमनुरी येथील बच्चेकंपनीसह नागरिक चांगलेच संतापून गेलेले आहेत. या उद्यानाची दारे उघडी करावीत यासाठी गेल्या काही वर्षापासून नागरिकांची मागणी सुरूच होती.मात्र, त्या मागणीला नगर पालीकेकडुन नेहमीच केराची टोपली दाखवली जात होती. शेवटी उद्यानाची होळी झाली अन यामध्ये करोडो रुपयांचा निधी खाक झाला आहे.

अग्निशमन दलाचे वरती माघून घोडे -

उद्यानात लागलेली आग ही संपूर्ण गवत व साहित्य जळून खाक झाल्यानंतर आपोआप विझली. शेवटी दाखल झालेल्या अग्निशमन दलाने धाव घेऊन, आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. तो पर्यन्त मात्र आग ही पूर्णपणे विझून गेलेली होती. यावरूनच अग्निशमन दलासह नगर परिषद किती तत्पर आहे याचा प्रत्यय आला.

आगीचे कारण अद्याप गुलदस्त्यात -

उद्यानामध्ये अग्नितांडव निर्माण झाले होते यामध्ये मोठी मोठी खेळणे ही भस्मसात झाली आहेत. सोबतच वेगवेगळ्या प्रकारची लावण्यात आलेली झाडे देखील जळून खाक झाली आहेत. एवढे असले तरी नेमकी आग लागली कशाने याचे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे. नगर पालीकेच्या वतीने आगीचे कारण शोधले जात आहे.

दोन दिवसांपूर्वी केले होते प्रवेशद्वारावर आंदोलन -

गेल्या अनेक वर्षापासून बंद असलेली या उद्याची दारे उघडावीत या मागणीसाठी मनसेच्या वतीने या उद्यानाच्या प्रवेशद्वारावर बच्चेकंपनीने आंदोलन करून नगर परिषदेकडे उदयानाची दारे उघडण्यासाठी विनवणी केली होती. अखेर दारे तर उघडलीच नाहीत मात्र आता उद्यानामधील सर्व साहित्य जळून खाक झाल्याने दारे उघडून नही आता उपयोग तरी काय होणार अशी चर्चा होऊ लागली आहे. यावर नगरपरिषद काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

सीओनी दिला यावर बोलण्यास नकार -

एवढी गंभीर घटना घडून देखील नगरपालिकेच्या सीओ उमेश कोठीकर यांनी या घटनेवर बोलण्यास स्पष्ट नकार दिला आहे. मात्र, सीओना नागरिक प्रश्न विचारू विचारू हैराण करून सोडत असल्याचे पाहायला मिळाले. आता चौकशी काय केली जाणार आणि कोणावर कारवाई केली जाणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Last Updated : Feb 10, 2021, 4:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.