ETV Bharat / state

संभाजी भिडेंच्या विरोधात ओंढा नागनाथ पोलिसांत तक्रार दाखल - ओंढा नागनाथ पोलिसांबद्दल बातमी

संभाजी भिडेंच्या विरोधात ओंढा नागनाथ पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार किरण घोंगडे यांनी दिली आहे.

Filed a complaint against Sambhaji Bhide with Ondha Nagnath police
संभाजी भिडेंच्या विरोधात ओंढा नागनाथ पोलीसात तक्रार दाखल
author img

By

Published : Apr 9, 2021, 8:50 PM IST

Updated : Apr 9, 2021, 9:21 PM IST

हिंगोली - संभाजी भिडे हे नेहमीच त्यांच्या वक्तव्याने चर्चेत राहतात. त्यांच्या विरोधात किरण घोंगडे यांनी ओंढा नागनाथ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. कोरोना हा रोगच नाही आहे. कोरोनाने जी माणस मरतात ती जगण्याच्या लायकीची नसतात, असे वक्तव्य त्यांनी केले होते.

संभाजी भिडेंच्या विरोधात ओंढा नागनाथ पोलीसात तक्रार दाखल

संपूर्ण देशभरात कोरोना ने प्रत्येक जण हैराण झालेले आहे. कित्येक जणांचा या कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या भयंकर महामारीमुळे कित्येक कुटुंबे उघड्यावर आली आहेत. तक्रारदार किरण घोंगडे यांना देखील कोरोना झालेला होता. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी फिरत असताना भिडे यांच्या वक्तव्यामुळे घोंगडे यांना अपमानित वाटत आहे. त्यामुळे त्यांनी भिडेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

कारवाई करण्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आश्वासन -

संभाजी भिडे यांनी केलेले आक्षेपार्ह विधान हे योग्य नसल्याचे सांगत, त्यांच्याविरोधात पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती कारवाई करणार असल्याचे औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी आश्वासन दिले आहे.

Last Updated : Apr 9, 2021, 9:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.