ETV Bharat / state

कुक्कुट व्यवसायिकाला कोरोनाने रडवले - कुक्कुट व्यवसायिकाला कोरोनाने रडवले

चिकन खाल्ल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होतो, अशा अफवा काहींनी समाज माध्यमांद्वारे पसरवली आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यवसायिक आणि कुक्कुट पालन करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाला आहे. त्यामुळे हा व्यवसाय डबघाईला आला असून काहींचे अश्रू अनावर झाले आहे.

कुक्कुट व्यवसायिक
कुक्कुट व्यवसायिक
author img

By

Published : Mar 11, 2020, 5:18 PM IST

Updated : Mar 11, 2020, 5:47 PM IST

हिंगोली- सध्या कोरोनामुळे सर्वांनाच धास्ती बसली आहे. चिकनमधून हा विषाणू पसरत असल्याची अफवा पसरवली जात आहे. त्यामुळे चिकनकडे अनेकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे धास्तावलेल्या पोल्ट्री व्यवसायिकांनी जिल्हाधिकाऱ्याकडे धाव घेतली असता, एका व्यवसायिकाला अश्रू अनावर झाले. तर पक्षी पाहून रात्रभर झोप येत नसल्याची भावना व्यक्त केली आहे.

कुक्कुट व्यवसायिकाला कोरोनाने रडवले

हिंगोली जिल्ह्यात तीनशेहून अधिक कुक्कुट पालन व्यवसायिक आहेत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत या कुक्कुट पालन व्यवसायिकांनी कर्ज घेऊन हा व्यवसाय सुरू केला. 80 ते 90 रुपयाला विक्री होणारी कोंबडी या कोरोनामुळे कोणी फुकट ही विचारायला तयार नाही. त्यामुळे या पक्षांना जगवणेही अवघड झाले असल्याचे व्यवसायिक सांगत आहेत. आता कोणी खरेदीसाठी येत नसल्याने, एवढ्या मोठ्या पक्षांच नेमके करावे तरी काय?, असा प्रश्न व्यवसायिकांसमोर उभा ठाकला आहे. पोल्ट्री फार्ममधील पक्षी नष्ट करण्याची परवानगी मागण्यासाठी शासन दरबारी काही व्यवसायिक आले होते. त्यावेळी आपल्या व्यथा मांडताना वगरवाडी येथील लक्ष्मण जाधव हे भावनाविवश झाले.

कोरोनाबाबतच्या अफवेमुळे कोंबडी आणि अंडे कोणी खायला तयार नाही. त्यामुळे एका कोंबडी मागे साधारण 215 रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे सरकारने यावर काही तरी विचार करून अनुदान देण्याची मागणी व्यवसायिकांच्या वतीने करण्यात आली आहे.

कोंबड्यांना मागणीच नसल्याने व्यवसायिकांना आत्महत्या करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. जवळपास 45 दिवसांमध्ये एक ते दीड लाख रुपये नफा मिळत असल्याचे कुकुट पालन व्यववसायिक शेख मुख्तार यांनी सांगितले. बॉयलरचे केवळ 45 दिवसाचेच जीवन आहे, नंतर खाद्य जास्त खाते त्यामुळे खर्चात वाढ होते. पण, अफवेने सध्या पोल्ट्रीतून मिळणारे अतिशय कमी झाले आहे. त्यामुळे व्यवसायिकांचे आर्थिक नियोजन बिघडले आहे.

हेही वाचा - CORONA VIRUS : हिंगोलीत बॉयलर दहा रुपये किलो; तरीही ग्राहकांची पाठ

Last Updated : Mar 11, 2020, 5:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.