ETV Bharat / state

काँग्रेसचे सरचिटणीस वेणूगोपाल यांनी घेतली सातव कुटुंबीयांची भेट

काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांनी कळमनुरी येथे सातव यांच्या निवासस्थानी जात कुटुंबीयांची बुधवारी भेट घेऊन सांत्वन केले. जवळपास अर्धा तास कुटुंबासोबत चर्चा केली. मात्र येथे फोटो काढण्यासाठी सक्त मनाई करण्यात आली होती.

author img

By

Published : May 26, 2021, 10:14 PM IST

काँग्रेसचे सरचिटणीस वेणूगोपाल
काँग्रेसचे सरचिटणीस वेणूगोपाल

हिंगोली - काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रासह देशात शोककळा पसरली आहे. त्यामुळे अधून-मधून अनेक दिग्गज सातव यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करीत आहेत. त्याचप्रमाणे काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणूगोपाल यांनी कळमनुरी येथे सातव यांच्या निवासस्थानी जात कुटुंबीयांची बुधवारी भेट घेऊन सांत्वन केले. जवळपास अर्धा तास कुटुंबासोबत चर्चा केली. मात्र येथे फोटो काढण्यासाठी सक्त मनाई करण्यात आली होती. सातव कुटुंबातील एकाला राज्यसभेचे सदस्यत्व देणार असल्याची चर्चा रंगली आहे. परंतु याबाबत कुठेही विधान करण्यात आलेले नाही.

अभ्यासू युवा नेता

काँग्रेस खासदार राजीव सातव यांनी कमी वयातच पक्षात फार मोठी जबाबदारी स्वीकारली होती. त्यामुळे सातव हे अंत्यत हुशार अन् अभ्यासू खासदार म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. तसेच काँग्रेसचे सर्वेसर्वा असणारे राहुल गांधी यांच्या अतिशय जवळचे खासदार राजीव सातव होते. गुजरात राज्याची प्रभारी पदाची असलेली जबाबदारी देखील सातव यांनी उत्कृष्ट प्रकारे निभावली. सौरराष्ट्रातून दोन हात करून विधानसभेचे अठ्ठाविस उमेदवार विजयी करण्यासाठी सातव यांचा फार मोठा सिहांचा वाटा होता. सोबतच विविध समित्यांमध्ये व केंद्र शासनाच्याही समित्यात सातव यांनी काम पाहिलेले आहे. अल्पावधीतच त्यांचे झालेले निधन हे संपूर्ण देशाला चटका लावून गेलेले आहे. त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली, ती कधी न भरून निघणारी आहे. त्यामुळे अनेक दिग्गज नेते हे सातव यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबाचे सांत्वन करीत आहेत. त्यानुसार आज काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांनी कळमनुरी येथे सातव यांच्या कोहिनूर नावाच्या निवासस्थानी भेट दिली आणि कुटुंबाचे सांत्वन केले. जवळपास अर्धा तास चर्चा झाली.

फोटो काढण्यास केली होती सक्त मनाई
वेणूगोपाल हे आज दिल्लीवरून नांदेड येथे आले आणि तेथून कळमनुरी येथे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या निवासस्थानी भेट घेतली. दरम्यान, सातव कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. विशेष बाब म्हणजे या ठिकाणी सातव कुटुंबाशिवाय कुणालाही प्रवेश देण्यात आला नव्हता. तसेच कुणाला फोटोदेखील काढण्यासाठी मनाई करण्यात आली होती. जवळपास अर्धा तास झालेल्या चर्चेनंतर या चर्चेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. वेणूगोपाल हे काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, खा. राहुल गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत. त्यामुळे सातव कुटुंबियांसोबत झालेली चर्चा ही अतिशय महत्त्वपूर्ण असेल अशी चर्चा होत आहे. खासदार राजू सातव यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर वेणुगोपाल हे दिल्लीकडे रवाना झाले आहेत.

हेही वाचा - शरद पवारांचे लक्षद्वीप प्रशासनाविरोधात पंतप्रधान मोदींना पत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.