ETV Bharat / state

सेनगाव नगरपंचायतीवर नागरिकांनी काढला हंडा मोर्चा; पाणी प्रश्न सोडविण्याची मागणी

सेनगाव नगरपंचायत वार्ड क्रमांक सात मधील महिला आणि पुरुषांनी पाणी प्रश्न सोडवण्यासाठी हंडा मोर्चा काढला होता. आक्रमक मोर्चेकऱ्यांमुळे अधिकारीदेखील घाबरले होते.यावेळी मोर्चातील महिला आणि पुरुषांनी घोषणाबाजी केली.

हंडा मोर्चा
author img

By

Published : Jul 8, 2019, 4:30 PM IST

हिंगोली - सेनगाव येथील नगरपंचायत वार्ड क्रमांक सात मधील पाणी प्रश्न गंभीर झाल्यामुळे त्रस्त झालेल्या महिला व पुरुषांनी चक्क रिकामे हंडे वाजवत मोर्चा काढला. रस्त्याने महिला व पुरुष रिकामे हंडे वाजवता येत असल्यामुळे त्यांना पाहण्यासाठी नागरिकांची चांगलीच गर्दी झाली होती.

हंडा मोर्चा

जिल्ह्यात आतापर्यंत दोन वेळा पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली, तरी देखील पाण्याची समस्या आतापर्यंत सुटलेली नाही. सेनगाव येथील पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. महिला वर्गाला पिण्याच्या पाण्यासाठी पावसाळ्याच्या दिवसात रानोमाळ भटकंती करावी लागत आहे.

नगरपंचायतीच्यावतीने याभागातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. मात्र,वार्ड क्रमांक सातमध्ये गेल्या वीस ते बावीस दिवसांपासून पाणीपुरवठा झाला नसल्याने महिलांची मोठी तारांबळ उडाली होती. या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी महिला आणि पुरुषांनी नगरपंचायतीवर वाजत गाजत आणलेल्या मोर्चामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच घाबरगुंडी उडाली होती. .यावेळी मोर्चेकरी चांगलेच आक्रमक झाले होते.

मोर्चेकऱ्यांच्या घोषणाबाजीने नगरपंचायत परिसर चांगलाच दणाणून गेला होता. आक्रमक झालेल्या महिला व पुरुषांना नगरपंचायत प्रशासन पाणी प्रश्नावर कोणते आश्वासन देते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Intro:
हिंगोली - सेनगगाव येथील नगर पंचायत समिती नेहमीच वेगवेगळ्या कारणाने चर्चेत राहते. आता वार्ड क्रमांक सात मधील पाणी प्रश्न एवढा गंभीर बनलाय की त्रस्त झालेल्या महिलांनी चक्क रिकामे हंडे वाजवत घागर मोर्चा काढलाय रस्त्याने महिला व पुरुष रिकामे हंडे वाजवता येत असल्यामुळे त्यांना पाहण्यासाठी ही नागरिकांची चांगलीच गर्दी झाली होती.

Body:सेनगाव येथील पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे जिल्ह्यात अद्याप पर्यंत दोन वेळा पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली तरी देखील पाण्याची समस्या अद्याप पर्यंत सुटलेली नाही महिला वर्गांना सांड पाण्यासह पिण्याच्या पाण्यासाठी रानोमाळ पावसाळ्याच्या दिवसात भटकंती करावी लागत आहे. याठिकाणी नगर पंचायतीच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली मात्र वार्ड क्रमांक सात मध्ये गेल्या वीस ते बावीस दिवसांपासून पाणीपुरवठा झाला नसल्याने महिलांची मोठी तारांबळ उडाली. तर वाजत गाजत नगरपंचायती वर आलेल्या मोर्चामुळे अधिकाऱ्यानाही चांगलीच घाबरगुंडी सुटली होती. तर मोर्चेकरी चांगलेच आक्रमक झाले होते. Conclusion:मोर्चेकऱ्यांच्या घोषणाबाजीने नगरपंचायत परिसर चांगलाच दणाणून गेला होता. आता आक्रमक झालेल्या महिला व पुरुषांना नगरपंचायत प्रशासन पाण्यासाठी कोणते आश्वासन देते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.