ETV Bharat / state

हिंगोली जिल्ह्यातून अपहरण झालेल्या व्यापाऱ्याची तेलंगणाच्या सीमेवरुन सुटका - पोलिसांनी या व्यापाऱ्याची तेलंगणा सीमेवरुन सुटका केली

कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील एका तंबाखू व्यापाऱ्याचे २५ जून रोजी दोन कोटी रुपयांसाठी अपहरण झाले होते. आज आखाडाबाळापुर पोलिसांनी या व्यापाऱ्याची तेलंगणा सीमेवरुन सुटका केली आहे. शेख कादर (50) असे अपहरण झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.

शेख कादर आणि पोलीस अधिकारी
author img

By

Published : Jun 26, 2019, 9:21 PM IST

हिंगोली- कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील एका तंबाखू व्यापाऱ्याचे २५ जून रोजी दोन कोटी रुपयांसाठी अपहरण झाले होते. आज आखाडाबाळापूर पोलिसांनी या व्यापाऱ्याची तेलंगणा सीमेवरुन सुटका केली आहे. शेख कादर (वय 50) असे अपहरण झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. मात्र, व्यापारी जखमी अवस्थेत आढळून आला आहे. व्यापाऱ्याचे अपहरण झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.

शेख कादर हे शेवाळा परिसरातील रस्त्याच्या बांधकामाच्या पाहणीला गेले होते. बराच वेळ होऊनही कादर घरी परतले नसल्याने त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा बराच शोध घेतला. मात्र, ते कुठेही सापडले नाही. शेवटी कादर यांच्या नातेवाईकांनी आखाडाबाळापुर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दिलेल्या तक्रारीच्या आधारे बाळापूर पोलिसांनी त्यांच्या मोबाईल सिग्नलवरुन त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना त्यातून अपयश आले. आज कादर यांच्या मुलाला वडिलांच्या फोनवरून फोन आला. या फोनवरून एका अनोळखी व्यक्तीने ''तुला तुझे वडील पाहिजे असतील तर तुझ्याकडील सोने किंवा दोन कोटी रुपये आणून दे नाहीतर तुझ्या वडीलाचे प्रेत घेऊन जा'' अशी धमकी आली. कादर यांच्या मुलाने तत्काळ सदर बाब आखाडाबाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणपत राहिरे यांना सांगितली. राहिरे यांनी सायबर ब्रँचला माहिती कळविली असता, अपहरणकर्ते तेलंगणाच्या दिशेने असल्याचे त्यांनी कळविले. मोबाईलच्या लोकेशननुसार गणपत राहिरे, जमादार संजय मार्केट, पुना प्रशांत शिंदे भालेराव यांच्या पथकाने तेलंगणाच्या दिशेने धाव घेतली.

यावेळी पोलीस आपल्या मागावर असल्याचा संशय आरोपीला आल्याने ते हुंडा गावातून गडबडीने निघुन जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, ही संशयास्पद हालचाल काही ग्रामस्थांच्या लक्षात आली. त्यांनी व्यापाऱ्याची मोठ्या धाडसाने सुटका केली. तोच पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले. मात्र, अपहरणकर्ते त्यावेळी पळून जाण्यात यशस्वी झाले होते. कादर हे जखमी झाले होते. त्यांच्या अंगावर जखमा झाल्या होत्या. त्यांना बाळापूर पोलीस ठाण्यात आणले असता त्यांना बघण्यासाठी ग्रामस्थानी ठाण्यात एकच गर्दी केली होती. कादर यांची सुटका जरी झाली असली. मात्र, या प्रकाराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Intro:हिंगोली- कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील एका तंबाखू व्यापाऱ्याचे २५ जून रोजी दोन कोटी रुपयांसाठी अपहरण केले होते. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता यावरून आखाडाबाळापुर पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून व्यापाऱ्याची तेलंगणा सीमेवरू आज सुटका केली. मात्र व्यापारी जखमी अवस्थेत आढळून आला. व्यापाऱ्यांचे अपहरण झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.

Body:शेख कादर (50) असे अपहरण झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. व्यापारी शेवाळा परिसरातील रोडवच्या बांधकामाच्या पाहणी गेले होते. बराच वेळ होऊन कादर हे घरी परतले नाही. त्यांच्या नातेवाईकांनी दादर यांचा बराच शोध घेतला मात्र ते कुठेही आढळून आले नाहीत. शेवटी कादर यांच्या नातेवाईकांनी आखाडाबाळापुर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दिलेल्या तक्रारीच्या आधारे बाळापूर पोलिसांनी त्यांच्या मोबाइल सिग्नल वरुन त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर सिग्न त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र अपयश आले. आज कादर यांच्या मुलाला वडिलांच्या फोनवरून फोन आला तर त्या फोनवरून एक अनोळखी व्यक्तीने ''तुझे तुला वडील पाहिजे असतील तर तुझ्याकडील सोने किंवा दोन कोटी रुपये आणून दे नाहीतर तुझ्या वडीलाचे प्रेत घेऊन जा'' अशी धमकी आली. कादर यांच्या मुलाने सदर बाब तात्काळ आखाडाबाळापुर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गणपत राहिरे यांना सांगितली. राहिरे यांनी सायबर ब्रॅंच ला माहिती कळविली असता, अपहरणकर्ते तेलंगणाच्या दिशेने असल्याचे त्यांनी कळविले. मोबाईलच्या लोकेशन नुसार गणपत राहिरे जमादार संजय मार्केट पुना प्रशांत शिंदे भालेराव यांच्या पथकाने तेलंगणाच्या दिशेने धाव घेतली.

Conclusion:पोलीस आपल्या मागावर असल्याचा संशय आरोपीला आल्याने ते हुंडा गावातून गडबडीने निघुन जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र ही संशयास्पद हालचाल काही ग्रामस्थांच्या लक्षात आली, अन त्यांनी व्यापाऱ्याची मोठ्या धाडसाने सुटका केली. तोच पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले अन अपहरणकर्ते पळून जाण्यात यशस्वी झाले. मात्र कादर हे जखमी झाले होते. त्यांच्या अंगावर जखमा झाल्या होत्या. त्याना बाळापूर पोलीस ठाण्यात आणले असता. व्यापारी कादर यांना बघण्यासाठी ग्रामस्थानी पोलीस ठाण्यात एकच गर्दी केली होती. या प्रकाराने मात्र नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

फोटो मेल केले आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.