ETV Bharat / state

हिंगोलीतून संविधान उद्देशिकेच्या वाचनास सुरुवात, शालेय शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थित केले वाचन

राज्य शासनाच्यावतीने 'सार्वभौमत्व संविधानाचे, जनहित सर्वांचे', हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी त्या उपक्रमाची प्रत्यक्ष सुरुवात हिंगोली येथील जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथून केली.

हिंगोलीतून संविधान प्रास्ताविकेच्या वाचनास सुरुवात

author img

By

Published : Jan 27, 2020, 10:45 AM IST

हिंगोली - शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या शाळेत संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. या उपक्रमाची सुरुवात हिंगोली जिल्ह्यातून झाली असून आता प्रार्थनेच्या वेळी नियमितपणे संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन होणार आहे.

हिंगोलीत संविधान उद्देशिकेच्या वाचनास सुरुवात

राज्य शासनाच्यावतीने 'सार्वभौमत्व संविधानाचे, जनहित सर्वांचे', हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी त्या उपक्रमाची प्रत्यक्ष सुरुवातही हिंगोली येथील हिंगोली जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथून केली. या उपक्रमासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, नागरिक आणि अधिकारी उपस्थित होते. संविधानाची मूल्य बालमनावर रुजविण्यासाठी हा उपक्रम आता दररोज प्रार्थनेच्या वेळी राबविण्यात येणार असल्याचा निर्णय शासनाच्यावतीने घेण्यात आला आहे.

हेही वाचा - चव न चाखताच हिंगोलीत पालकमंत्र्यांनी केले शिवभोजन थाळीचे उद्घाटन

तसेच जिल्ह्यातील शैक्षणिक मागासलेपण दूर करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय आणि अन्य उपक्रमही हाती घेण्यात येणार आहेत. पुन्हा एकदा या जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याने नेमकी कोणती विकासाची कामे या जिल्ह्यात बाकी आहेत, याची आपल्याला पूर्णपणे माहिती असल्याचे देखील पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. निश्चितच जिल्ह्यातील विकासाची कामे पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न देखील करणार असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या.

हेही वाचा - पालकमंत्र्यांच्या दौऱ्यात प्लास्टिक मोहिमेचा फज्जा

Intro:*

हिंगोली- येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या उपस्थितीत संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले. हिंगोली जिल्ह्यातुनच या उपक्रमास सुरुवात झालीय. तर आता प्रार्थनेच्या वेळेत नियमित संविधानाच्या प्रस्ताविकेच वाचन होणार आहे.
Body:
राज्य शासनाच्या वतीने सार्वभौमत्व संविधानाचे जनहित सर्वांचे, हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्या उपक्रमाची प्रत्यक्ष सुरुवातही हिंगोली येथून शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रजासत्ताक दिनी हिंगोली येथील जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथे केलीय. या उपक्रमासाठी मोठ्या प्रमाणात विध्यार्थी व नागरिक अन अधिकारी उपस्थित होते. संविधानाची मूल्य बालमनावर रुजविण्यासाठी हा उपक्रम आता दररोज प्रार्थनेच्या वेळी राबविण्यात येणार असल्याचा शासनाच्या वतीने निर्णय घेण्यात आला आहे. Conclusion:तसेच हिंगोली जिल्ह्याचे शैक्षणिक मागासच दूर करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय व अन्य उपक्रमही हाती घेण्यात येतील. विशेष म्हणजे मला पुन्हा एकदा या हिंगोली जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याने नेमकी कोणती विकासाची कामे या जिल्ह्यात बाकी आहेत याची मला पूर्णपणे जाण असल्याचे देखील पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. निश्चितच जिल्ह्यातील विकासाची कामे पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न देखील करणार असल्याचे, पालकमंत्री गायकवाड यांनी संगितले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.