हिंगोली - औंढा नागनाथ मंदिर हे ऐकून बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग जगभरात प्रसिद्ध आहे. हे मंदिर मोठे आकर्षक आहे. भाविकांना या मंदिरावरील नक्षीकाम भुरळ घालते. येथे दर्शनासाठी येणारे भाविक हे फक्त महाराष्ट्रातील नसून जगभरातून अनेक राज्यातील भाविक येथे दर्शनासाठी येताता. (Jyotirlingas Aundha Nagnath Temple ) एकदा दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे आपसूकच पुन्हा पुन्हा पावले या मंदिराकडे वळली वळतात. महत्वाचा असलेला क्षण म्हणजे महाशिवरात्री या दिवसाचे सोंदर्य पाहण्यासाठी भाविक अजिबात वेळ घालत नाहीत. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या महाभयंकर कोरोना लाटेमुळे सर्वांचा आकर्षक आलेला महाशिवरात्री महोत्सव प्रशासनाने रद्द केला आहे. यंदा तीच परिस्थिती असल्याने, भाविकांना नागनाथाच्या दर्शनापासून मुकावे लागणार आहे.
मंदिराच्या नक्षीकामाचे प्रत्येक वेगळेपण भाविक आपल्या मोबाईलमध्ये टिपतात
जगभरातील बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवी ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथील नागनाथाच्या मंदिराची महती सर्वदूर आहे. मंदिरावरील नक्षीकाम पाहिले तर बरच काही सांगून जाते. येथे खूपच बारकाईने नक्षीकाम करण्यात आलेले आहे. हे नक्षीकाम पाहून भाविक हे आश्चर्यचकित होतात. तसेच, त्या मंदिराच्या नक्षीकामाचे प्रत्येक वेगळेपण भाविक आपल्या मोबाईलमध्ये टिपतात. या मंदिराची एकूण 100 फूट उंची असून या मंदिराला कुठलाही पाया नाही हे विशेष आहे. (Aundha Nagnath Temple In Hingoli) जमिनीच्या पृष्ठभागावरच या मंदिराची रचना करण्यात आलेली आहे. तर मंदिराला असलेल्या दोन प्रकारच्या रंगरंगोटी वरून देखील या मंदिराचा इतिहास सांगितला जातोय.

पाच हजार वर्षापूर्वीचे आहे मंदिर
श्री नागनाथ यांचे मंदिर हे मागील पाच हजार वर्षांपूर्वी असल्याचे सांगितले जाते. मंदिराची अजून एक महत्त्वाची ख्याती म्हणजे हे मंदिर एकाच पाषाणाच्या अखंड काळ्या दगडांमध्ये कोरले आहे. दगडावर हत्ती, घोडे, पालखी, वर्धमान महावीराची देखील मूर्ती दिसते. तर मंदिराला मुख्य तीन दरवाजे आहेत. मंदिराचा मुख्य भाग हा भूगर्भ आहे. (Mahashivaratra In Aundha Nagnath Temple ) लांबलचक रांगेत थांबल्यानंतर मुख्य भूगर्भात असलेल्या श्री नागनाथाचे दर्शन घेतल्या नंतर भाविकांचा अक्षरशः शिन भाग हरवून जातो.

नागनाथाला ओळखले जाते हरिहर नावाने
सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या औंढा येथील नागनाथ आला हरिहर नावाने ओळखले जाते तर मंदिराच्या भूगर्भात असलेली पिंड ही महादेव अन श्री विष्णू देवांची असल्याचे सांगितले जातेय, पूजे निमित्त या पिंडीवर बेल, फुले, दुर्वा व नारळाची आरास वाहण्यात येते. त्यामुळे मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या फूल विक्रेत्यांना चांगले दिवस येतात परंतु कोरोनामुळे येथील मंदिराचे दारच बंद करण्यात आल्यामुळे या लघु व्यवसाय का वर उपासमारीची वेळ येऊन ठेपलेली आहे ती या वर्षी कशीबशी सुधारेल अशी अपेक्षा या व्यावसायिकांना होती मात्र शेवटी यंदाही हा महोत्सव प्रशासनाने रद्द केल्याने उपासमारीची वेळ ही कायम ठेवलेली आहे.

या मंदिराचा प्रत्येक भाग हा अति महत्वाचा असून या ठिकाणी करण्यात आलेली कलाकृती देखील भाविकांना मोहात पाडणारी आहे तर या मंदिराचा जीर्णोद्धार हा अहिल्याबाई होळकर यांनी करून त्यांनीच या मंदिराच्या कळसाची स्थापना देखील केली असल्याची नोंद इतिहास आहे. अजून एक महत्त्वाची नोंद म्हणजे याठिकाणी संत नामदेव महाराज हे कीर्तन करत असताना मंदिराने आपली जागा बदलण्याचा देखील येथील भाविकांचा समज आहे त्यामुळे मंदिरापासून काही अंतरावरच संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांची देखील मंदिर आहे या ठिकाणी शीख बांधव आवर्जून संत नामदेवाचे दर्शन घेत असताना नागनाथाच्या मंदिरात देखील दर्शनासाठी हजेरी लावतात. एवढेच नव्हे तर जगभरातून भाविक या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी दाखल होतात.

सर्वांचा आकर्षक असतो तो येथील रथोत्सव
महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी मोठी यात्रा भरते यातूनच लाखो रुपयांची उलाढाल देखील होते या कालावधीमध्ये जगभरातून भाविक या ठिकाणी हजेरी लावून नागनाथाची दर्शन घेतात तर या बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या नागनाथाच्या मंदिरामध्ये अजूनही सौंदर्याने भर घातलीय ती म्हणजे निसर्ग सौंदर्याने, आजू बाजूने असलेल्या टेकड्या, तसेच यामध्ये उभारण्यात आलेले पर्यटन स्थळ, तलाव यामुळे भाविक हे अक्षरशः मोहित होत, येथील पर्यटन स्थळाचा आनंद घेत आहेत. येथे महाशिवरात्रीला अति महत्व असून, या मध्ये महत्वाचा उत्सव म्हणजे रथोत्सव मंदिर परिसरात असलेल्या रथाच्या असंख्य भाविकांच्या उपस्थितीत मंदिराला पाच फेऱ्या घातल्या जातात. मागील काही वर्षांपूर्वी फेऱ्या घालताना दुर्घटना घडली होती, तेव्हा पासून का उत्सव फार काळजीपूर्वक साजरा केला जातोय, कोरोना मुळे तर हे सर्व बंदच झाले आहे.

निसर्गाने घातलीय आणखीनच सोंदर्यात भर
येथे संस्थानच्या वतीने सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्याने गेल्या पाच ते सहा वर्षांपासून भविकांच्या संख्येय प्रचंड वाढ झालेली आहे. तर येथे आलेल्या भाविकाला निसर्गाचा आनंद घेता यावा म्हणून सस्थांच्याच जागेवर नागनाथ उद्यान उभारले आहे. उद्यानालाच लागून असलेल्या तलावात भाविक बोटिंग चा देखील आनंद घेतात, तर गोकर्ण पहाड म्हणून ओळख असलेल्या पहाडावर वेगवेगळ्या प्रकारच्या वृक्षाचा समावेश आहे., त्यामुळे येथील वृक्ष देखील भाविकांना एक प्रकारे भुरळच घालतात. त्यामुळे हळूहळू येथे पर्यटन स्थळ हे नावारूपाला येत आहे.
हेही वाचा - Mahashivratri 2022 : जाणून घ्या! महाशिवरात्री मुहूर्त, पौराणिक कथा आणि व्रत