ETV Bharat / state

विशेष : लग्नसमारंभातील जेवणानंतर पोटाचा त्रास दुर करण्यासाठी काय करावे? - Stomach Problems After Wedding Meal

विवाह समारंभात गेल्यानंतर नातेवाईकांचा आग्रहामुळे विवाह समारंभासाठी आलेले पाहुणे जेवण टाळत नाहीत. मात्र जेवण केल्यानंतर तेलकट पदार्थ खाण्यात गेल्याने पोटात बिघाड होण्याची दाट शक्यता आहे. ( Stomach Problems After Wedding Meal ) त्यामुळे जेवताना तर काळजी घेतलीच पाहिजे. तसेच आयोजकांनी देखील तेलकट पदार्थ बनवण्याचे टाळावे जेणेकरुन, जेवण झाल्यानंतर कुणाचे ही पोट बिघडणार नाही, असे डॉ. विठ्ठल रोडगे म्हणाले. ( Anesthesiologist Dr. Vitthal Rodge )

Stomach problems after a wedding meal
लग्नसमारंभातील जेवणानंतर पोटाचा त्रास
author img

By

Published : Dec 11, 2021, 5:33 PM IST

हिंगोली - दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आता कोरोना परिस्थिती आटोक्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे. तरीदेखील अधून मधून रुग्ण संख्या वाढत असल्याने भीतीचे वातावरण आहे. त्यात लग्नसराईला सुरुवात झाली आहे. ( Marriages After Corona in Maharashtra ) लग्न व रिसेप्शन म्हटले की जेवण आलेच. मात्र, जेवणानंतर शक्यतोवर पोट बिघडण्याची भीती सर्वांनाच वाटते. त्यामुळे जेवण करण्यापूर्वी किंवा केल्यानंतर काय काळजी घ्यायला हवी? याबाबत पोटविकार तज्ञ डॉ. विठ्ठल रोडगे ( Anesthesiologist Dr. Vitthal Rodge ) यांच्याशी ईटीव्ही भारतने विशेष संवाद साधला. वाचा, ते काय म्हणाले?

पोटविकार तज्ञ डॉ. विठ्ठल रोडगे याबाबत बोलताना

कोरोना महामारीमुळे लग्न समारंभ व रिसेप्शनचे दोन वर्षांपासून प्रमाण घटले आहे. यावर्षी कुठे कोरोना महामारीची लाट आटोक्यात आलेली असल्याने आता कुठे विवाह समारंभाला सुरुवात झाली आहे. विवाह समारंभात गेल्यानंतर नातेवाईकांचा आग्रहामुळे विवाह समारंभासाठी आलेले पाहुणे जेवण टाळत नाहीत. मात्र जेवण केल्यानंतर तेलकट पदार्थ खाण्यात गेल्याने पोटात बिघाड होण्याची दाट शक्यता आहे. ( Stomach Problems After Wedding Meal ) त्यामुळे जेवताना तर काळजी घेतलीच पाहिजे. तसेच आयोजकांनी देखील तेलकट पदार्थ बनवण्याचे टाळावे जेणेकरुन, जेवण झाल्यानंतर कुणाचे ही पोट बिघडणार नाही, असे डॉ. विठ्ठल रोडगे म्हणाले.

भाज्यांमध्ये तेलाचा वापर कमी करावा -

लग्नसमारंभ तसेच रिसेप्शनला येणाऱ्या पाहुण्याच्या संख्येचा अंदाज घेऊन स्वयंपाक बनवला जात आहे. जेवणातील भाजी उठून दिसण्यासाठी त्यामध्ये सर्वाधिक जास्त तेलाचा वापर केला जातो. मात्र ते टाळणे नितांत गरजेचे आहे. जास्तीत जास्त आजार हे तेलामुळेच जडण्याची दाट शक्यता असल्याने, आयोजकांनी तेलाचा वापर कमी करूनच स्वयंपाक बनवावा, असे आवाहन डॉ. रोडगे यांनी केले आहे.

हेही वाचा - Sharad Pawar Speech Book : तुम्ही प्रत्येकांची नावे लक्षात कसे ठेवता? कवी किशोर कदमांच्या प्रश्नांवर शरद पवारांनी दिले 'हे' उत्तर

पोट बिघाड झाल्यास घ्यावी अशी काळजी -

कार्यक्रमातील तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर जर पोट बिघडले तर सर्वप्रथम घरगुती उपाय करून पाहावेत. यानंतरही काहीच फरक जाणवला नाही तर पोट विकारतज्ञ यांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही कार्यक्रमांमध्ये तेलकट पदार्थ खाणे आवश्यक टाळावे, असे आवाहनही डॉ. विठ्ठल रोडगे यांनी केले. आता फास्टफूडवर देखील भर दिला जातो. फास्टफूडमुळे देखील पोटाचे विकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता फास्ट फूडही टाळणे गरजेचे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.