ETV Bharat / state

हिंगोलीत वीज पडून महिला ठार, 4 जखमी; 3 जनावरांचा मृत्यू - हिंगोली वीज दुर्घटना

हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील जरोडा येथे शेतात वीज पडून एक महिला व शेळीचा जागीच मृत्यू झाला आहे. चार महिला जखमी झाल्या आहेत. तर, औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथे एक गाय आणि बैलाचा वीज पडल्याने मृत्यू झाला आहे.

हिंगोली
हिंगोली
author img

By

Published : Jun 7, 2021, 7:19 PM IST

हिंगोली - जिल्ह्यात आज (7 जून) दुपारी विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. यामध्ये कळमनुरी तालुक्यातील जरोडा येथे शेतात वीज पडून एक महिला व शेळीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर चार महिला जखमी झाल्या आहेत. दुसऱ्या घटनेत औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथे घरासमोर बांधलेली दोन गुरे दगावली आहेत.

इंदिराबाई कोंडबाराव भिसेंचे मृत्यू

इंदिराबाई कोंडबाराव भिसे (79 वर्षे. रा. जरोडा) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर रेणुका प्रकाश भिसे, सुरेखा प्रकाश भिसे, जिजाबाई गायकवाड, अकुबाई सूर्यवंशी अशी जखमी महिलांची नावे आहेत. ह्या सर्व महिला जरोडा येथील देविदास भिसे पाटील यांच्या शेतात पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला गेल्या होत्या.

केशव रिठेंच्या दोन जनावरांचा मृत्यू

आज सकाळपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झालेले होते. त्यात दुपारच्या वेळेस अचानक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे मजूर महिला या पावसापासून बचाव करण्यासाठी झाडाखाली जाऊन थांबल्या होत्या. तेवढ्यात वीज पडली आणि इंदिराबाई व त्यांच्यासोबत असलेल्या एका शेळीचा जागीच मृत्यू झाला. तर ओंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथे केशव रिठे यांनी घरासमोर बांधलेल्या गाय आणि बैलावरही वीज पडली. त्यामुळे ते जागीच ठार झाले.

घटनेची माहिती कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. महसूल विभागाचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. जरोडा येथे बाळापूर पोलीस ठाण्याचे स.पो.नि. रविकांत हुंडेकर, संजय मार्के, मधुकर नागरे आदींनी धाव घेतली. घटनेची नोंद केली आहे. मृत इंदिराबाई यांच्या पश्चात पती, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

पेरणीपूर्व मशागतीला गती

हिंगोली जिल्ह्यात सध्या पेरणीपूर्व मशागतीला गती आली आहे. रात्री-अपरात्री शेती मशागतीची कामे ट्रॅक्‍टरच्या साह्याने केली जात आहेत. अशातच अधून-मधून पाऊसही हजेरी लावत आहे. या पावसामुळे शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. सध्या खते बी-बियाणे खरेदी करण्यासाठी विविध कृषी केंद्रावर शेतकऱ्यांची एकच गर्दी दिसून येत आहे.

नुकसान भरपाईची मागणी

खरीपाची पेरणी तोंडावर आली आहे. अशा परिस्थितीत आज वीज पडून एक महिला, गाय आणि बैल दगावला आहे. त्यामुळे पेरणीचा प्रश्न बैलाचे मालक रिठे यांच्यासमोर उभे राहिले आहेत. आता पेरणी करायची कशी? कोणाची बैलजोडी मागायची? असे एक ना अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. त्यामुळे पंचनामे करून नुकसान भरपाई लवकरात लवकर द्यावी, अशी मागणी रिठे यांनी केली आहे.

हेही वाचा - नौदलाच्या अधिकाऱ्याविरोधात बलात्कारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.