ETV Bharat / state

अवघ्या 45 सेकंदात चोरट्याने दुकानातून लांबवली 20 तोळे सोने असलेली बॅग - गोंदिया क्राईम बातमी

गोंदिया शहराच्या मध्यभागी एका दुकानातून 20 तोळे सोन्याची बॅग चोरट्याने अवघ्या 45 सेकंदात लंपास केले.

चोरटा
चोरटा
author img

By

Published : Nov 5, 2020, 7:20 PM IST

Updated : Nov 5, 2020, 9:46 PM IST

गोंदिया - ऐन दिवाळीच्या तोंडावर गोंदिया शहरातील मध्य भागी असलेल्या गजबजेल्या गणेशनगर येथील भर दिवसा आभूषण ज्वेलर्समधून दोन चोरट्यांनी 10 लाख किंमतीचे 20 तोळे सोन्याची बॅग पळवून नेल्याची घटना आज (दि. 5 नोव्हेंबर) दुपारच्या सुमारास घडली आहे.

या घटनेमुळे शहरातील सोने-चांदी विक्री करणाऱ्या ज्वेलर्समध्ये दहशत पसरली आहे. गोंदिया शहरातील गणेशनगर परिसरात दीपक सोनी यांचे सोने-चांदीचे दुकान असून ते दुकानात आल्यानंतर सोने आणि चांदी भरलेल्या बॅग दुकानात ठेवून लघुशंकेसाठी दुकान उघडेच ठेवून शेजारी गेले. यादरम्यान, मोटारसायकलवरुन दोन अज्ञात चोरटे येवून फक्त 45 सेकंदात सोन्याची बॅग घेवून भरधाव वेगाने पसार झाले. पोलिसांनी गणेशनगर परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमरे पाहत असून धाडसी चोरी करून पसार झालेल्या आरोपींची शोध घेत आहेत. गोंदिया शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असुन चोरटीचा तपास सुरु आहे.

दिवाळी हा सण अवघ्या आठ दिवसांवर येवून ठेपले आहे. बाजारपेठेत मोठी गर्दी आहे. त्यातच कोरोनामुळे गोंदिया जिल्ह्यातील सर्व कैद्यांना तुरूंगातून सोडण्यात आले आहे. त्यामुळे तुरूंगातून आलेल्या चोरट्यांनी कदाचित ही धाडसी चोरी तर केली असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा - विनयभंगाच्या गुन्ह्यात बॉलिवूडचा हास्यअभिनेता विजय राजला अटक

Last Updated : Nov 5, 2020, 9:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.