ETV Bharat / state

गोंदियात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निषेधार्थ नागरिकांची स्वाक्षरी मोहिम - गोंदियात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निषेधार्थ स्वाक्षरी

शहरात झालेल्या डांबरीकरणाचे काम हे निकृष्ट दर्जाचे असल्याने गोंदियातील नागरिकांनी स्वाक्षरी मोहिम राबवली.

मोहिमेत स्वाक्षरी करताना
मोहिमेत स्वाक्षरी करताना
author img

By

Published : Feb 25, 2020, 1:31 PM IST

गोंदिया - शहराच्या मरारटोलीपासून मामाचौक दरम्यान रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम करण्यात आले आहे. हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने येथील नागरिकांनी कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध करत आज स्वाक्षरी मोहिमेला सुरवात केली.

गोंदियात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निषेधार्थ स्वाक्षरी मोहिम

गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. अग्रवाल यांनी अधिकाऱ्यांना बोलावत कान उघडणी केली. अधिकऱ्यांनी देखील काम निकृष्ट असल्याचे कबूल करत चौकशी करू, असे आश्वासन दिले, तर हे काम तिरोडा येथील उमेश असाटी या कंत्राटदाराला देण्यात आले असून या कंत्राटदारने यापूर्वीही गोंदिया शहरात अनेक रस्त्यांचे कामे निकृष्ट दर्जाची केली आहेत. त्यामुळे त्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून बिल न देता पुन्हा नव्याने रस्ता तयार करून द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे, तर आमदार विनोद अग्रवाल यांनी देखील या संदर्भात चौकशी करून योग्य कारवाई करू, असे आश्वासन दिले.

कंत्राटदाराने सार्वजनिक रस्ता तयार करताना शहरातील एका नामंकित डॉक्टराच्या घरासमोरील सुरक्षा भिंतीला लागून असलेल्या मोकळ्या जागेवर देखील त्यांना वैयक्तीक लाभ देत पार्कींगसाठी डांबरीकरण करून दिल्याने नागरिकांनी प्रशन चिन्ह उपस्थित केला असून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा - गोंदियाला गारपिटीसह अवकाळी पावसाने झोडपले, शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामाचे प्रचंड नुकसान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.