ETV Bharat / state

गोंदियातील शाळा सुरू; दिवसाआड वर्ग भरणार अल्फा बेटप्रमाणे

author img

By

Published : Nov 24, 2020, 5:51 PM IST

गोंदिया शहरातील नामांकित गुजराती शाळेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर A ते L पर्यंतच्या विद्यार्थ्याना अल्फा बेटप्रमाणे सोमवार, मंगळवार आणि शुक्रवारला शाळेत बोलवण्यात आले आहे. तर M ते Z अल्फा बेट असलेल्या विद्यर्थ्यांना मंगळवार, गुरुवार आणि शनिवारला बोलवण्यात आले आहे.

school
गोंदियातील शाळा सुरू

गोंदिया - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या आठ महिन्यांपासून शाळा बंद होत्या. मात्र, राज्य सरकारच्या निर्णयाप्रमाणे 23 नोव्हेंबरपासून ९ ते १२ पर्यंतच्या जिल्हा परिषदेच्या तसेच खासगी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.

गोंदियातील शाळा सुरू

अल्फा बेटप्रमाणे दिवसाआड लागणार वर्ग

गोंदिया शहरातील नामांकित गुजराती शाळेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर A ते L पर्यंतच्या विद्यार्थ्याना अल्फा बेटप्रमाणे सोमवार, मंगळवार आणि शुक्रवारला शाळेत बोलवण्यात आले आहे. तर M ते Z अल्फा बेट असलेल्या विद्यर्थ्यांना मंगळवार, गुरुवार आणि शनिवारला बोलवण्यात आले आहे. विद्यार्थी व शिक्षकांना शाळेत येताच त्यांची थर्मल तपासणी करण्यात आली, तर मास्क आणि सॅनिटायजरचा वापर केल्यावरच शाळेत प्रवेश दिले आहे. विद्यार्थ्यांना वर्गात सोशल डिस्टन्स व मास्क घालून शिक्षण दिले जात आहे.

३५० विद्यार्थ्यांच्या पालकांचे संमतीपत्र

३५० विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेत मुलांना पाठवण्यासाठी संमतीपत्र लिहून दिले आहे. तर शिक्षकांनी देखील कोरोना चाचणी केल्यावर त्यांना शाळेत येण्याची परवानगी देण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातिल आदर्श विद्यालयातदेखील १२ वीच्या विद्यार्थ्यांना सोमवार, बुधवार आणि शुक्रवार तर ११ वीच्या विद्यार्थ्यांना मंगळवार, गुरुवार आणि शनिवारला शाळेत बोलवण्यात आले आहे.

शाळेच्या द्वारावर स्वयंचलित सॅनिटायजर

विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या द्वारावर स्वयंचलित सॅनिटायजर मशीन लावण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना मास्क लावल्यावरच शाळेत प्रवेश दिला जात आहे. शिक्षकांनीदेखील कोरोना चाचणी केली की नाही याची देखील मुख्याध्यापकांनी तपासणी केली आहे. कोरोनामुळे मागील ८ महिन्यांपासून विद्यार्थी घरी बसून ऑनलाईन शिक्षणाचे धडे घेत होते. मात्र, आता ऑफलाईन शिक्षण मुलांना शाळेत मिळत असल्याने मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे. तर शिक्षकांना देखील विधार्थी शाळेत आल्याने त्यांच्या चेहऱ्यावर देखील आनंद दिसत आहे.

हेही वाचा - प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीची कारवाई: 'केंद्रीय संस्थांचा राजकीय द्वेषासाठी गैरवापर'

हेही वाचा - शिवेसनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीच्या कारवाईचे संजय निरुपम यांच्याकडून स्वागत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.