गोंदिया - जिल्ह्यात कालपासून ढगाळ वातावर निर्माण झाले आहे. आज सकाळी पहाटे अवकाळी पावसाने हजेरी लावली. पुन्हा सायंकाळी पावसाने तुरळक ठीकाणी पाऊस झाला. जिल्ह्यात आतापर्यंत 2.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून शेतकऱ्यांच्या चिंतेत पुन्हा वाढ झाली आहे.
हवामान खात्याने 18 ते 19 मार्च दरम्यान अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. अरबी समुद्र आणि दक्षिणेकडून वाहणारे बाष्पयुक्त वारे एकत्र येणार असल्याने पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. हवामान खात्याने विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार गोंदियात पावसाला सुरुवात झाली. व वातावरणात गारवा निर्माण झाला. शहरातील काही भागात जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या असून काही भागात मध्यम व तुरळक स्वरूपाचा पाऊस झाला. उन्हाळ्याची चाहूल लागत असताना झालेल्या पावसाने गारवा निर्माण झाला. मात्र, रब्बी हंगामातील काही पीके शेतात काढून टाकलेली असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
वातावरण बदलाने रब्बी पिके धोक्यात-
वातावरण बदलामुळे जिल्ह्यातील रब्बी पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. सतत येणाऱ्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान होउन त्यांना आर्थिक फटका बसला. जिल्ह्यात आतापर्यंत उन्हाळी धान पिकांसह हरभरा, गहू, लखोळी, जवस, वटाना, पोपट, उडीद, मुग, मका, सुर्यफुल, करडई, भाजीपाला, बटाटा, वांगी, मिरची आदी पिकांची शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे. धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये पावसाचा लहरीपणा व किंडींचा प्रभावामुळे उत्पादन घटले होते. खरीप हंगामात धानाचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांची भिस्त रब्बी पिकावर आहे. मात्र ढगाळ वातावरण, किडींचा प्रादुर्भाव आदी कारणामुळे पिके संकटात आहेत. सध्याचे वातावरण काहीचे ढगाळ व अधुन मधून पावसाच्या सरी येत असल्याने, अश्या वातावरणात रबी पिकांवर मोठ्या प्रमाणात करपा व कडाकरपा तसेच इतर किडींचाही प्रादुर्भाव झाला आहे.
हेही वाचा- पुणे कोरोना अपडेट: दिवसभरात २८३४ पॉझिटिव्ह