ETV Bharat / state

रानडुकराची शिकार करणारे आरोपी जेरबंद, एक जण फरार

जिल्ह्यातील सालेकसा येथे रानडुकराची शिकार करणाऱ्या फरार आरोपींच्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून रानडुकराचे मांस, कुऱ्हाड व इतर साहित्य आणि चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे.

Police have arrested the accused in the hunt for ranchers Wild pig
रानडुकराची शिकार करणारे फरार आरोपींची जेरबंद,
author img

By

Published : Jan 10, 2020, 5:12 PM IST

गोंदिया - जिल्ह्यातील सालेकसा येथे गुप्त माहितीच्या आधारावर सालेकसा वनपरिक्षेत्र अधिकारऱ्यांच्या पथकाने जांभळी येथील रानडुकराची शिकार करणाऱ्या फरार आरोपींची टोळीला जेरबंद केले आहे. या प्रकरणात रानडुकराचे मांस, कुऱ्हाड व इतर साहित्य, चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. या टोळीतील एकूण आठही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

रानडुकराची शिकार करणारे फरार आरोपींची जेरबंद,

जांभळी येथे रानडुकराची शिकार करून मटनावर ताव मारला जात आहे. अशी गुप्त माहिती सालेकसा वनपरिक्षेत्र अधिकारी यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर ३ जानेवारीला वन विभागाच्या पथकाने जांभळी येथे धाड टाकून प्रकाश सुरजलाल कुसराम व हिरालाल गोमाजी कुंजाम या दोघांना पकडले. दरम्यान त्यांच्या घरून रानडुकराचे मांस व कुऱ्हाडीसह इतर साहित्य जप्त करण्यात आले होते. दोन्ही आरोपींना ४ जानेवारीला न्यायालयात हजर करण्यात आले.

न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान दोघांची कसून चौकशी केली असता या प्रकरणात आणखी आरोपी असल्याची बाब समोर आली. यावरून ८ जानेवारीला बाकी आरोपी भैय्यालाल ढेकवार, तेजलाल ढेकवार, मुकेश ढेकवार, राधेश्याम ढेकवार, राजेंद्र ढेकवार, गोपाल लिल्हारे (सर्व रा.जांभळी) यांना देखील अटक करण्यात आली. शिकारीसाठी वापरण्यात आलेली बोलेरो (क्र. एमएच ४०/के-६९५२) जप्त करण्यात आली. रानडुकर शिकार प्रकरणात एकुण ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र, यातील एक आरोपी अद्याप फरार आहे. फरार आरोपी टिल्लु उर्फ बेनिराम नागपुरे (रा. मोहनटोला) याचा वनविभाग शोध घेत आहे.

Intro:
Repoter : - OM PRAKASH SAPATE
Mobil No. :- 9823953395
Date :- 10-01-2020
Feed By :- Reporter App
District :- gondia
File Name :- mh_gon_10.jan.20_hunter was arrested_7204243
टीप :- रेड्डी टू एयर पैकेज पाठवली आहे
रानडुकराची शिकार करणारे फरार आरोपींची जेरबंद
एक फरार आरोपीचा शोध सुरू
Anchor :- गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा येथे गुप्त माहितीच्या आधारावर सालेकसा वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या पथकाने जांभळी येथील रानडुक्कराची शिकार करणा-या फरार आरोपींची टोळीला जेरबंद केली आहे. या प्रकरणात रानडुकराचे मांस, कु-हाड व इतर साहित्य, चारचाकी वाहन हि जप्त करण्यात आले आहे. तसेच या टोळीतील एकुण आठही आरोपीना अटक करण्यात आली आहे.
VO :- जांभळी येथे रानडुकराची शिकार करून मटनावर ताव मारले जात आहे. अशी गुप्त माहिती सालेकसा वनपरिक्षेत्र अधिकारी यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर ३ जानेवारी रोजी वन विभागाच्या पथकाने जांभळी येथे धाड टाकून प्रकाश सुरजलाल कुसराम व हिरालाल गोमाजी कुंजाम या दोघांना पकडले. दरम्यान त्यांच्या घरून रानडुकराचे मांस व कु-हाडीसह इतर साहित्य जप्त करण्यात आले होते. दोन्ही आरोपींना ४ जानेवारी रोजी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान दोघांची कसून चौकशी केली असता या प्रकरणात आणखी आरोपी असल्याची बाब समोर आली. यावरून ८ जानेवारी रोजी बाकी आरोपी मध्ये भैय्यालाल ढेकवार, तेजलाल ढेकवार, मुकेश ढेकवार, राधेश्याम ढेकवार, राजेंद्र ढेकवार, गोपाल लिल्हारे सर्व रा.जांभळी यांना देखील अटक करण्यात आली. तसेच शिकारीसाठी वापरण्यात आलेले बोलेरो क्र. एमएच ४०/के-६९५२ जप्त करण्यात आली. रानडुकर शिकार प्रकरणात एकुण ८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र, यातील एक आरोपी अद्याप फरार आहे. फरार आरोपी टिल्लु उर्फ बेनिराम नागपुरे रा. मोहनटोला याचा वनविभाग शोध घेत आहे.
BYTE :- एम. एम. गजबिये (क्षेत्र सायक, अधिकारी, वनविभाग सालेकसा)Body:VO:-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.