ETV Bharat / state

'अजित पवार यांना नोटीस पाठवणं म्हणजे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न'

author img

By

Published : Oct 18, 2020, 8:34 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल यांना पत्रकारांनी राज्याचे उपमुखमंत्री अजित पवार यांना पुन्हा ईडीद्वारे नोटीस पाठविण्यात आली आहे, याबाबत काय सांगणार अशी विचारणा केली. यावेळी उत्तर देताना 'नुसतं नोटीस पाठवणं हे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यापलीकडे दुसरे काही नाही', अशी प्रतिक्रिया पटेल यांनी दिली.

प्रफुल्ल पटेल
प्रफुल्ल पटेल

गोंदिया - लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि विशेष तपास पथक (एसआयटी) या दोन्ही यंत्रणांकडून बहुचर्चित सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाल्यानंतर आता सक्तवसुली संचालनालय (ईडी) पुन्हा सक्रिय झाले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत गोंदियात आयोजित एका पत्रकार परिषदेत खासदार प्रफुल्ल पटेल यांना विचारणा केली असता त्यांनी 'ही नोटीस म्हणजे निव्वळ लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठीचा प्रयत्न' असल्याची प्रतिक्रिया दिली.

प्रतिक्रिया देताना खासदार प्रफुल्ल पटेल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल हे दोन दिवसांकरीता गोंदिया-भंडारा दौऱ्यावर होते. त्यानंतर, आज (रविवार) गोंदिया येथे पटेल यांनी पत्रकार परिषद घेत सुरू असलेल्या कामांबद्दल संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. दरम्यान, पत्रकारांनी त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुन्हा ईडीद्वारे नोटीस पाठविण्यात आली आहे, याबाबत काय सांगणार अशी विचारणा केली. तेव्हा पटेल म्हणाले, 'माझ्या मते नुसतं नोटीस पाठवणं हे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यापलीकडे दुसरे काही नाही'.

अजित पवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि विशेष तपास पथक (एसआयटी) या दोन्ही यंत्रणांकडून बहुचर्चित सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट मिळाली आहे. महारष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या प्रकरणामध्ये अजित पवार यांचा कुठलाही संबध नाही. ते त्यामध्ये कधीही चेयरमेन नाही तर डायरेक्टर होते. आणि त्याबाबतही पोलिसांकडून कोर्टात त्यांच्याविरोधात कोणतेही पुरावे सादर करता आले नाही. त्यामुळे, जर त्यांना नोटीस येत असेल तर त्याचे उत्तर अजित पवार व त्यांचे वकील यांच्यामार्फत देण्यात येईल अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी यावेळी दिली.

हेही वाचा - नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प पर्यटन १ नोहेंबरपासून पुन्हा सुरु

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.