गोंदिया - तिरोडा तालुक्याअंतर्गत येणाऱ्या चुरडी गावातील पतीने आपल्या पत्नीसह मुला मलीची हत्या केली. तसेच त्यांच्या हत्येनंतर आरोपीने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रेवचंद बिसेन असे हत्या करून आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. तर मालता बिसेन -पत्नीचे (४५ ) , मुलगी पोर्णीमा (20) आणि तेजस बिसेन (17) अशी मृतांची नावे आहेत. या हत्याकांडाने तालुक्यात मात्र खळबळ उडाली आहे.
रेवचंद डोंगरू बिसेन यांच्याकडे ३ मेटॅडोर व एक ट्रॅक्टर आहे. ते ट्रान्सपोर्टचे काम करत होते. प्रामुख्याने रेशनचे धान्य ट्रान्सपोर्ट करण्याचा त्यांचा व्यवसाय होता. २१ सप्टेंबरच्या पहाटे बिसेन कुटुंबीय घरी साखर झोपेत असताना बिसेन यांनी बायको आणि मुलांच्या डोक्यात वार करून त्यांची हत्या केल्याची माहिती समोर आली. यावेळी मालता रेवचंद बिसेन या एका बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. तर मुलगी पोर्णिमा रेवचंद बिसेन )२०) व मुलगा तेजस बिसेन (१७) ही दोन्ही मुले दुसऱ्या बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले. तसेच रेवचंद यांचा मृतदेह घरातील पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता.
घटनास्थळावरील दृश्ये पाहता प्रथम दर्शनी रेवचंद बिसेन यानेच पत्नी आणि मुलांची हत्या करून स्वत: आत्महत्या केली असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे आरोपींनी नियोजनबध्द पध्दतीने ही हत्या केली असावी ? असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेची माहिती मिळताच तिरोडाचे ठाणेदार योगेश पारधी, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन यादव व पोलीस अधिक्षक विश्व पानसरे घटनास्थळाला भेट दिली. तसेच घटनास्थळापासून 15 फूट अंतरावर हत्येसाठी वापरण्यात आलेले ट्रॅक्टरचा स्पेंडल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तिरोडाच्या उपजिल्हा रुग्णालयात नेले.
ही घटना घडली त्यावेळी बिसेन यांची वयोवृद्ध आई घराच्या बाहेर वऱ्हाड्यांतच झोपली होती. मात्र तिला घरात काय घडले याचा अंदाज देखील आला नाही का? याचा तपास पोलीस आता करत आहेत. खेमनबाई डोंगरू बिसेन असे त्यांचे नाव आहे.
हेही वाचा - सोलापूरमध्ये बचतगट कार्यालसमोर कर्मचारी व ग्राहकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी
हेही वाचा - महंत नरेंद्र गिरी यांच्या पार्थिवावर आज होणार अंत्यविधी, प्रयागराज जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना सुटी