गोंदिया - भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपमधील बंडखोरी थांबण्याचे नाव नाही. सोमवारी नामांकन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या अधिकृत उमदेवाराव्यतिरिक्त भाजपच्याच इतर २ बंडखोर नेत्यांनी पक्ष निर्णयाला तडा देता भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे.
भाजपच्या या बंडखोर नेत्यांमध्ये माजी खासदार खुशाल बोपचे तसेच किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र पटले यांचा समावेश आहे. त्यामुळे या प्रतिष्ठेच्या लढाईत भाजपला स्वतःच्याच घरातून विरोधाला सामोरे जावे लागत आहे. २८ मार्च ही नामांकन मागे घेणयाची तारीख आहे. त्यामुळे यादिवशी कोण अर्ज मागे घेतो आणि कोणत्या पक्षाला मदत करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.