आमदार अग्रवालांकडून नुकसानग्रस्त शेतांची पाहणी; तातडीने पंचनामे करण्याच्या अधिकाऱ्यांना सुचना - MLA Vinod Aggarwal Devendra Fadnavis Meet News
२६ आणि २७ ऑक्टोबरला झालेल्या अवकाळी पावसामुळे गोंदिया जिल्ह्यात देखील हलक्या वाणाच्या धानाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे गोंदिया विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी गोंदिया विधानसभा क्षेत्रात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या धान पिकांची पाहणी केली.
गोंदिया- २६ आणि २७ ऑक्टोबरला झालेल्या अवकाळी पावसामुळे गोंदिया जिल्ह्यात देखील हलक्या वाणाच्या धानाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे गोंदिया विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी गोंदिया विधानसभा क्षेत्रात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या धान पिकांची पाहणी केली. त्याचबरोबर, त्यांनी लवकरात लवकर पंचनामे करून योग्य मोबदला देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
दरवर्षी दिवाळीआधी हलक्या प्रजातीचा धान कापनीला येतो. दिवाळी आनंदात साजरी करता यावी यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात हलक्या धानाची लागवड करतात. मात्र, हलक्या धानाची कापणी झाली असताना अचानकन अवकाळी पावसाने हजेरी लावली. कापून ठेवलेल्या धानाला शेतातच पुन्हा अंकुर आले. तर, भारी प्रजातीचा धान कापनीला असताना तो अवकाळी पावसामुळे खाली पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दिवाळीच्या तोंडावर आस्मानी संकट कोसळले आहे.
सरकारने मात्र ज्या भागात अतिवृष्टी झाली अश्या शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा, असा जीआर काढला आहे. त्यात अतिवृष्टी हा शब्द वगळून अवकाळी पाऊस टाकावा, अशी मागणी गोंदिया विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. दरम्यान, आमदार अग्रवाल यांनी स्वतः अधिकऱ्यांसह बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शासनाकडून योग्य मोबदला मिळवून देऊ, असे अस्वशान शेतकऱ्यांना दिले.
हेही वाचा- '५ लाख कोटींचे कर्ज घेऊन राज्याला फडणवीस सरकारने विकले, आम्ही जाब विचारू'
Mobil No :- 9823953395
Date :- 02-10-2019
Feed By :- Reporter App
District :- gondia
File Name :- mh_gon_02.nov.19_mal vinod agrwal pik pahani
अतिदुष्र्टी नसुन अवकाळी पाऊस आहे त्याचा मोबदला द्या नवनिर्वाचित अपक्ष आ. विनोद अग्रवाल यांची मागणी
Anchor :- २६ आणि २७ आक्टोंबरला झालेल्या अवकाळी पाऊसामुळे गोंदिया जिल्यात देखील हलक्या वाणाच्या धानाचे मोठे नुकशान झाले असल्याने गोंदिया विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी गोंदिया विधानसभा क्षेत्रात अवकाळी पाऊसामुळे नुकशान झालेल्या धान पिकांचे पाहणी करीत अधिकर्यांना लवकरात लवकर पंचनामे करून योग्य मोबदला देण्याच्या सूचना दिल्या.
VO :- दरवषी दिवाळी आधी हलक्या प्रजातीचा धान कंपनीला येत असून दिवाळी आनंदात साजरी करता यावी यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात हलक्या धनाची लागवळ करतात ,मात्र हलक्या धानाची कापणी झाली असताना अचानकन अवकाळी पाऊसाने हजेरी लावल्याने. कापून ठेवलेल्या धानाला शेतातच पुन्हा अंकुर आले तर भारी प्रजातीचा धान कंपनीला आला असताना अवकाळी पाउसा मुळे खाली पडला असून. शेतऱ्यांवर दिवाळीच्या तोंडावर आस्मानी संकट कोसडले असता. सरकारने मात्र ज्या भागात अतिवृष्टी झाली अस्या शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा असा जीआर काढला असून अतिवृष्टी हा शब्द वगळून अवकाळी पाऊस टाकावा अशी मागणी गोंदिया विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली असून. स्वतः अधिकऱ्यां सह बांधावर जाऊन नुकशान ग्रस्थ शेतकऱ्याचे भेट घेत शासनाकडून योग्य मोबदला मिळवूं देऊ अशे अस्वशान दिले आहे
BYTE :- विनोद अग्रवाल (नवनिर्वाचित अपक्ष आमदार गोंदिया)
BYTE :- सुरेश तुंमडाम (तालुका कृषी अधीकारी गोंदिया) (निळा शर्ट घातलेला)
BYTE :- राजेश भांडारकर (तहसीलदार गोंदिया) (पांढरा सर्ट घातलेला)
VO :- तर अधिकऱ्यानी देखील दोन दिवसात संपूर्ण क्षेत्राचा आढावा घेत पंचनामा करुण शाशन दरबारी अहवाल पाठवून योग्य मोबदला शेतकर्याना मिळवून देण्याचे आसवाशन दिले आहे. Body:VO:-Conclusion: