ETV Bharat / spiritual

नोकरी, कौटुंबिक जीवनासह संपत्ती मिळविण्यात यश मिळेल का? वाचा साप्ताहिक राशीभविष्य - WEEKLY HOROSCOPE

दैनंदिन राशीभविष्यावरून रोजच्या घडामोडींचा अंदाज येतो. तर येणारा आठवडा मेष ते मीन राशींसाठी कसा कसा जाईल? जाणून घ्या 'ईटीव्ही भारत'वरील साप्ताहिक राशीभविष्यात.

Weekly Horoscope
साप्ताहिक राशीभविष्य (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 19, 2025, 2:45 AM IST

मेष (Aries) : हा आठवडा आपल्यासाठी सामान्य आहे. ज्या व्यक्ती नोकरी करत असून ती बदलण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हा आठवडा प्रतिकूल आहे. व्यापारवृद्धी किंवा व्यापाराशी संबंधित कामे करण्यासाठी आठवडा अनुकूल आहे. प्रणयी जीवनात अचानकपणे राग येऊन आपल्या नात्यात कटुता सुद्धा येऊ शकते. आपण जर रिअल इस्टेटशी संबंधित एखादे मोठे कार्य करण्याचा प्रयत्न करत असाल तर एखाद्या तज्ञ व्यक्तीचा सल्ला जरूर घ्या. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी आठवडा अनुकूल आहे. या आठवड्यात आपली प्रकृती ठीक राहील.

वृषभ (Taurus) : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आरोग्याच्या दृष्टीनं हा आठवडा सकारात्मक फळ देणारा होऊ शकतो. त्यामुळं आपल्यात भरपूर उत्साह निर्माण होईल. ह्या आठवड्यात आपण आपला मानसिक तणाव कमी करण्यासाठी एखाद्या ठिकाणी फिरावयास जाण्याची योजना आखू शकता. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्या व्यक्तींसाठी आठवडा प्रतिकूल आहे. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी काहीसा त्रासदायी असू शकतो. ह्या आठवड्यात आपण फर्निचर, अध्ययन किंवा एखाद्या डिझाईन कार्यासाठी आपला पैसा खर्च करू शकता. प्रणयी जीवनात आपण आणि आपली प्रेमिका या दरम्यान काही गैरसमज झाल्यानं कटुता येण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. ह्या आठवड्यात वैवाहिक जीवन सुखद होईल. आपण आपल्या वैवाहिक जोडीदाराच्या सहवासात अत्यंत सुखद क्षण घालवू शकाल.

मिथुन (Gemini) : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. आपण जर मागील काही दिवसांपासून नोकरी बदलण्याचा विचार करत असलात तर त्यात पुढे जाण्यासाठी हा आठवडा अनुकूल आहे. ह्या आठवड्यात आपणास आपल्या योग्यतेनुसार संधी मिळू शकते. व्यापाऱ्यांसाठी सुद्धा हा आठवडा लाभदायी आहे. ह्या आठवड्यात आपण जर बाहेर कोठे फिरावयास जाणार असाल तर सर्व प्रथम आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. अन्यथा आपणास सर्दी, खोकला किंवा घशाचे विकार त्रस्त करण्याची संभावना आहे. या आठवड्यात आपणास वाहन खरेदी करण्याची संधी सुद्धा मिळू शकते. परंतु, उत्साहित होऊन आर्थिक गुतंवणूक करणं टाळावं. आपल्या प्रणयी जीवनात एखाद्या तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप संभवतो, जो आपल्यात कटुता निर्माण करू शकतो. तेव्हा सावध राहावं.

कर्क (Cancer) : हा आठवडा आपल्यासाठी सामान्यच आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळू शकते. परंतु, कामातील आधिक्यामुळं आपणास थकवा जाणवू शकतो. या आठवड्यात आपण आपल्या व्यापारात नवीन काही करण्याचा प्रयत्न करू शकता. आपण एखादा चांगला सौदा सुद्धा करू शकता. आपण जर शेअर्स बाजारात आर्थिक गुंतवणूक करण्याचा विचार करत असलात तर अति उत्साहित होऊन त्यात पैसे गुंतवू नका. अशी गुंतवणूक करण्यास आठवडा प्रतिकूल आहे. आपण जर कोणत्याही प्रकारचे कर्ज घेऊ इच्छित असाल तर थोडं सावध राहावं. या आठवड्यात आपल्या प्रणयी जीवनातील माधुर्य टिकून राहील. एखाद्या जुन्या गोष्टीमुळं वैवाहिक जीवनात कटुता निर्माण होऊ शकते. अशावेळी शांत राहावं. शारीरिक तंदुरुस्तीसाठी दिनचर्येत बदल करण्या व्यतिरिक्त योगासन आणि ध्यान-धारणा करणं हितावह होईल.

सिंह (Leo): हा आठवडा आपल्यासाठी सामान्यच आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना या आठवड्यात जास्त मेहनत आणि परिश्रम करावं लागू शकतं. वरिष्ठांशी संबंधातील माधुर्य टिकवून ठेवण्यासाठी आपणास आपल्या वागणुकीवर लक्ष ठेवावं लागेल. या आठवड्यात व्यापारी नवीन भागीदारी करू शकतात. परंतु भागीदारीशी संबंधीत कागदपत्रांची कामे लक्षपूर्वक करावीत. या आठवड्यात आपणास डोकेदुखी आणि पोटाशी संबंधित एखादी समस्या त्रस्त करू शकते. तेव्हा आपल्या प्रकृतीवर विशेष लक्ष द्यावं. विशेषतः बाहेरील पदार्थ खाणे टाळावे. या आठवड्यात आपण हौस-मौज करण्यावर अधिक खर्च करू शकाल. त्यामुळं आपण पैश्यांची बचत करू शकणार नाही. ह्या आठवड्यात आपल्या शंकेखोर स्वभावामुळं आणि त्यावर नियंत्रण नसल्यानं आपल्या प्रणयी नात्यात दुरावा येऊ शकतो. ह्या आठवड्यात आपल्या वैवाहिक जीवनात जोडीदाराशी समन्वय साधण्याचा प्रयत्न करावा, अन्यथा तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.

कन्या (Virgo) : हा आठवडा आपल्यासाठी सामान्यच आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी आठवडा मेहनत आणि संघर्ष करण्याचा असेल. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी अत्यंत खुश होण्याचा आहे. नवीन सौदा झाल्यानं आपणास लाभ होऊ शकतो. हा आठवडा शेअर्स बाजारात किंवा सट्टा बाजारात गुंतवणूक करण्यासाठी सामान्य फलदायी आहे. ज्या विद्यार्थ्यांना आपली शाळा किंवा महाविद्यालय बदलायचे आहे त्यांच्यासाठी हा आठवडा अनुकूल आहे. या आठवड्यात आपली पूर्वीची प्रेमिका आपल्याकडं परत येण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात तोलून मापून बोलावं लागेल.

तूळ (Libra) : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. प्रकृती सामान्यच राहील. पोटाशी संबंधित विकार टाळण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवावं. या आठवड्यात व्यापाऱ्यांना अपेक्षित कंत्राट मिळू शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी आठवडा सामान्यच आहे. परंतु आपणास जर नोकरीत बदल करावयाचा असेल तर आठवडा त्यास अनुकूल नाही. या आठवड्यात आपली आर्थिक स्थिती उत्तम राहीली तरी खर्च सुद्धा वाढणार आहेत. आपणास जर एखाद्या प्रॉपर्टीसाठी कर्ज घ्यावयाचं असेल तर आपण त्यात यशस्वी व्हाल. वैवाहिक जीवनात आपसातील नात्यात दुरावा येण्याची स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्यानं या आठवड्यात आपणास धैर्य बाळगावं लागेल. या दरम्यान आपण कोणतीही गोष्ट आपल्या वैवाहिक जोडीदारापासून लपवून न ठेवण्याची दक्षता घ्यावी. विद्यार्थ्यांनी अभ्यासात कोणत्याही प्रकारे हयगय करू नये. याउलट अपेक्षित यश प्राप्तीसाठी भरपूर मेहनत करावी. जे विद्यार्थी एखाद्या व्यावसायिक विषयाचा अभ्यास करू इच्छितात त्यांना ह्या आठवड्यात यश मिळू शकतं.

वृश्चिक (Scorpio) : हा आठवडा प्रकृतीच्या दुर्ष्टीने चांगला असला तरी एखाद्या जुनाट विकारामुळे आपण त्रस्त होऊ शकता. ह्या आठवड्यात व्यवसायासाठी अधिक उत्साह असल्याचे आपणास जाणवेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींचे मन मात्र त्रासलेले राहील. अशा वेळी ज्या व्यक्ती नोकरी बदलू इच्छितात त्यांना तसे न करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. ह्या आठवड्यात गृह सजावटीच्या वस्तू, कपडे व शिक्षण ह्यावर आपला खर्च जास्त होऊ शकतो. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमणार नाही. त्यांचे मन बाहेरील विषयात जास्त रमेल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना ह्या आठवड्यात आपली मेहनत वाढवावी लागेल. प्रणयी जीवनात धैर्य बाळगावे लागेल, अन्यथा आपल्या प्रेमिकेशी कटुता निर्माण होऊ शकते. वैवाहिक जीवनात एखाद्या तिसऱ्या व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. अशा वेळी दोघांनी संवाद साधून समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करावा.

धनु (Sagittarius) : हा आठवडा आपल्यासाठी सामान्यच आहे. या आठवड्यात आपणास आपल्या प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. विशेषतः ज्यांना यकृताशी संबंधित समस्या आहेत त्यांना हि काळजी घ्यावी लागेल. या आठवड्यात आपण व्यवसायात चांगली उन्नती करू शकाल. ज्या व्यक्ती सौंदर्य प्रसाधनाशी संबंधित वस्तूंचा व्यवसाय करतात त्यांना या आठवड्यात चांगली अर्थ प्राप्ती होऊ शकेल. ज्यांना नोकरी बदलण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा आठवडा प्रतिकूल असल्यानं त्यांनी सध्या शांत राहावं. या आठवड्यात विद्यार्थ्यांचं अभ्यासात विशेष असं लक्ष लागणार नाही. ते एखाद्या वादात अडकण्याची संभावना आहे. जर त्यांना एखाद्या नवीन विषयाचा अभ्यास करावयाचा असेल तर ते द्विधेत राहतील. हा आठवडा एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्यास अनुकूल आहे. शेअर्स बाजार किंवा सट्टा बाजारात आर्थिक गुंतवणूक करण्यास आठवडा प्रतिकूल आहे. एखाद्या गोष्टीमुळं प्रणयी जीवनात कटुता येण्याची संभावना आहे. या आठवड्यात वैवाहिक संबंध खूपच दृढ होतील.

मकर (Capricorn) : हा आठवडा आपल्यासाठी सामान्यच आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा अपेक्षेनुसार अनुकूल नसेल. आपण जर नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर आपला निर्णय काही दिवसांसाठी राखून ठेवा. याउलट जेथे कार्यरत आहात तेथेच नोकरी चालू ठेवा. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी काहीसा त्रासदायी आहे. ज्यांना अर्धशिशीचा त्रास आहे त्यांचा त्रास उफाळून येण्याची शक्यता असल्यानं त्यांनी या आठवड्यात विशेष काळजी घ्यावी. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा खर्चांचा आहे. यादरम्यान घरगुती वस्तू खरेदी करण्यासाठी आपण पैसा खर्च करू शकता. या आठवड्यात काही कारणाने प्रेमिकेशी कटुता निर्माण झाल्याची जाणीव आपणास होऊ शकते. विवाहितांसाठी हा आठवडा चांगला आहे. आपण आपल्या वैवाहिक जोडीदारासह एखाद्या विषयावर सल्ला - मसलत करून आपल्या मनातील भावना त्यांच्या समक्ष व्यक्त करू शकाल.

कुंभ (Aquarius) : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्ती जर सध्याच्या नोकरीत खुश नसतील आणि त्यामुळं त्यांना ती बदलावयाची असेल तर ते त्या दिशेने वाटचाल करू शकतात. त्यासाठी हा आठवडा आपणास अनुकूल आहे. आपणास जर एखाद्या प्रॉपर्टीत आर्थिक गुंतवणूक करावयाची असेल तर आपण ती करू शकता. मात्र अशी गुंतवणूक करण्यापूर्वी एखाद्या तज्ञ व्यक्तीचा सल्ला अवश्य घ्यावा. ह्या आठवड्यात आपली प्रकृती ठीक राहील. परंतु दुर्लक्ष केल्यास आपणास रक्तवाहिन्यांशी संबंधित एखादी जुनी समस्या त्रस्त करू शकते. तेव्हा आपल्या दिनचर्येत ध्यान-धारणा, योगासन ह्यांना प्राधान्य द्यावं. ह्या आठवड्यात आपण प्रेमिकेच्या सहवासात बराचसा रोमँटिक वेळ घालवू शकाल. आपण प्रेमिकेसह बाहेर फिरावयास सुद्धा जाऊ शकता. वैवाहिक जीवनात तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप टाळण्याचा प्रयत्न करा, अन्यथा आपल्या वैवाहिक जीवनात कटुता निर्माण होऊ शकते.

मीन (Pisces) : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. जे सध्याची नोकरी बदलू इच्छितात त्यांच्यासाठी आठवडा अनुकूल आहे. ह्या आठवड्यात व्यापारी त्यांच्या व्यवसायाशी संबंधित एखादा मोठा निर्णय घेऊ शकतील. या आठवड्यात आपली प्रकृती पूर्वीच्या मानाने चांगली राहिली तरी ती टिकवून ठेवण्यासाठी नियमितपणे योगासने करावीत. ह्या आठवड्यात आपण एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी पैसा खर्च करू शकता. विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश प्राप्त होऊ शकते. या आठवड्यात आपण आपल्या प्रेमिकेच्या सहवासात रोमँटिक क्षण घालविण्याचा प्रयत्न कराल. दांपत्य जीवन सुखद होईल. आपण आपल्या वैवाहिक जोडीदारासह एखाद्या ठिकाणी फिरावयास जाऊ शकता.

हेही वाचा -

  1. मकर संक्रातीनिमित्त आज पहिले अमृत स्नान, महाकुंभ मेळाव्यात लाखो भाविकांनी घेतला सहभाग
  2. सत्यम...सत्यम...दीड्डम...दीड्डम..! 900 वर्षांची परंपरा असलेल्या सिद्धेश्वर महायात्रेला सुरुवात, अक्षता सोहळा संपन्न

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.