गोंदिया - रविवारपासून मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात व छत्तीसगड राज्यात जोरदार पाऊस पडला. त्यामुळे संजय सरोवर येथील पाणी वैनगंगा नदीत सोडण्यात आले. त्यामुळे नदी पातळीत वाढ होऊन याचा फटका हा गोंदिया जिल्ह्यातील नदी काठच्या गावांना बसला आहे. त्यामुळे ढिवरटोला व किंडगीपार येथील २५ कुटुंबाचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.
हेही वाचा - शासनाच्या धोरणांवर गोंदियातील शिक्षकांचा हल्लाबोल; शिक्षक संघाचे धरणे आंदोलन
पाण्यामुळे तिरोडा-धापेवाडा-गोंदिया मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. तर तिरोडा तालुक्यातील चांदोरी, किंडगीपार, ढिवरटोली व गोदिंया तालुक्यातील धापेवाडा, मुरदाडा, पिपरी या गावात पाणी शिरले आहे. त्यामुळे नदीकाठच्या 25 कुटुंबातील 50 ते 60 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. तर आजारी नागरिकांनाही सुरक्षित ठिकाणी पोचवण्यात आले आहे.
हेही वाचा - गोंदियात ३३ किलोचा गांजा जप्त, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई
या सर्व लोकांना दिवंगत लक्ष्मण राव मानकर आदिवासी आश्रम शाळा गोंडमोहाडी येथे हलवण्यात आले आहे. तसेच नदीचा प्रवाह बघता गोंदिया आपत्ती व्यवस्थापन विभाग लक्ष ठेऊन आहे.