ETV Bharat / state

उपजिल्हाधिकारी राहुल खांडेभराड यांचे कोरोनाने निधन

गेल्या एक महिन्यापासून ते कोरोनाची लागण झाल्याने नागपूर येथे उपचार घेत होते.

Khandebharad
Khandebharad
author img

By

Published : Jan 15, 2021, 5:02 PM IST

गोंदिया - जिल्हाधिकारी कार्यालयातील भुअर्जन उपजिल्हाधिकारी राहुल खांडेभराड यांचे आज शुक्रवारला रात्री एकच्या सुमारास नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना कोरोनाने मुळे निधन झाले आहे. गेल्या एक महिन्यापासून ते कोरोनाची लागण झाल्याने नागपूर येथे उपचार घेत होते.

जिल्ह्याने गमावला युवा अधिकारी

तिरोडा उपविभागीय अधिकारीपदाचा पदभार सांभाळतानाच त्यांना कोरोनाची लागण झाल्याने ते उपचारासाठी रजेवर गेले होते. त्यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यामुळे एक चांगला युवा अधिकारी गोंदिया जिल्ह्याने गमावला आहे. तर कुटुंबीयांवरही संकट ओढवले गेले आहे. मनमिळावू आणि ओबीसी युवकांसाठी एक प्रेरणास्त्रोत असे व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख होती. ओबीसी युवकासांठी मार्गदर्शन करण्यासाठी व आपल्या युवकांनी प्रशासकीय सेवेत यावे, ही त्यांची भूमिका सातत्याने राहिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.