गोंदिया - संपूर्ण राज्यासह गोंदिया जिल्ह्यातदेखील आज कोरोना लसीकरणाला सुरूवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात आज जिल्हा सामान्य रुग्णालय, तिरोडा उप जिल्हा रूग्णालयात, देवरी ग्रामीण रुग्णालयांमध्ये लसीकरण पार पडणार आहे. आठवड्यातून चार दिवस रोज १०० लोकांना लसीकरण करण्यात येणार आहे.
आरोग्य विभातील लोकांचे लसीकरण -
आज याची सुरूवात गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयातून झाली. वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेन्द्र यांना ही पहिली देण्यात आली. तर दुसरी लस जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशात तुरकर यांना देण्यात आली. तसेच यापुढे आरोग्य विभातील इतर लोकांना हे लसीकरण करण्यात येणार आहे.
उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मोहिमेची सुरुवात -
राज्यात आज कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या मोहिमेची सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला कोरोना योद्ध्यांना ही लस दिली जाणार आहे. राज्यात कोरोना लसीकरणासाठी केंद्र शासनाकडून लसींची पुरवठा करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या निर्देशनुसार सर्व जिल्ह्यांना लसींचे वाटप केले जात आहे. राज्यातील २८५ केंद्रांवरून आरोग्य कर्मचाऱ्यांना आज लस देण्यात येणार आहे.
हेही वाचा - अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक आणि कृणाल पांड्याच्या वडिलांचे निधन