गोंदिया - जिल्ह्यात मागील २ ते ३ वर्षा आधी १० हजार लोक (Godia Blood Donation) रक्तदान करायचे. मात्र, मागील २ वर्षापासून कोविडमुळे रक्तदानाचे ( Blood Donation Decrease In Gondia ) प्रमाण घटले आहे. कोरोना काळात जिल्ह्यात 2 ते ३ वर्षाच्या तुलनेत फक्त ४ हजार ६०० लोकांनी रक्तदान केले आहे. तसेच नागरिकांनी जास्तीत जास्त रक्तदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी ( Gondia Collector Appeal For Blood Donation ) केली आहे.
रक्तदान करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन -
जिल्ह्यात सद्या रक्तसंकलन कमी प्रमाणात होत आहे. रक्तसाठा कमी असल्याने प्रत्येक नागरिकांनी रक्तदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नयना मुंडे यांनी केले आहे. तसेच प्रत्येक मुलीने रक्तदान करायचा प्रयत्न केला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. पुढे बोलताना त्यांनी मुलींच्या आरोग्याबाबतही चिंता वक्त केली. मुलींचे हिमोगोबींन हे उत्तम राहिले पाहिजे. त्या करिता त्यांनी हिरव्या भाजीपाला खाव्या, फळ खाल्या पाहिजेस, जेणे करून त्यांचा हिमोग्लोबिन कमी होणार नाही. हिमोग्लोबिन कमी झाले, तर त्यांना अनेक प्रॉब्लेम होतात म्हणून महिलांनी आपल्या आहारावर लक्ष ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी नयना मुंडे यांनीही रक्तदान केले.