ETV Bharat / state

चालकाच्या मृत्यूनंतर कंपनीला आली जाग; मागण्या पूर्ण करण्याचे दिले लेखी पत्र - Primary Health Center Ambulance Case

आरोग्य विभागातील १०२ रूग्णवाहिकांच्या कंत्राटी वाहनचालकांनी वेतनाच्या मागणीसाठी गोंदिया येथील जिल्हा परिषदेसमोर बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनात सहभागी झालेल्या वाहनचालकाचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला आहे.

gondia
आंदोलना दरम्यानची दृश्ये
author img

By

Published : Nov 26, 2019, 8:06 PM IST

गोंदिया- आरोग्य विभागातील १०२ रूग्णवाहिकांच्या कंत्राटी वाहनचालकांनी वेतनाच्या मागणीसाठी गोंदिया येथील जिल्हा परिषदेसमोर बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनात सहभागी झालेल्या वाहनचालकाचा हृदयविकाराच्या तीव्र धक्याने मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी घडली असून प्रेमभाऊ पिकलमुंडे असे मृत वाहनचालकाचे नाव आहे. दरम्यान, ही घटना घडल्यानंतर कन्नाटी कंपनीने वाहचालकांच्या मागण्यांना पूर्ण करण्याचे लेखी पत्र दिले आहे.

माहिती देताना अंशुल बर्डे, मुख्य व्यवस्थापक, अश्कोम मीडिया प्रा. लिमीटेड कंपनी

प्रेमभाऊ पिकलमुंडे हे भंडारा जिल्ह्यातील धोप येथील रहिवासी होते. ते मुंडीकोटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वाहनचालक म्हणून कार्यरत होते. गर्भवती महिला व लहान मुलांना रूग्णसेवा देता यावी यासाठी आरोग्य विभागाकडून १०२ रूग्णवाहिका सेवा पुरविली जाते. शासनाने रुगवाहिकेची सेवा पुरवण्याचे कंत्राट मध्यप्रदेश राज्यातील भोपाल येथील अश्कोम मीडिया प्रा. लिमिटेड या कंपनीला दिला आहे. मात्र, सदर कंपनी रुग्णवाहिका चालकांना वेळेवर व नियमानुसार वेतन देत नाही. त्यामुळे, जिल्ह्यातील ७८ रूग्णवाहिकांच्या चालकांनी १८ नोव्हेंबरपासून जिल्हा परिषदेसमोर कामबंद आंदोलनाला सुरवात केली. या आंदोलनाला आठवडा लोटूनही कोणताही तोडगा निघाला नसल्याने वाहनचालकांनी आंदोलन सुरूच ठेवले.

मृतक प्रेमभाऊ पिकलमुंडे हे संपात सहभागी होते. मात्र, काही कारणास्तव ते एक दिवसाकरीत घरी गेले व सोमवारी आंदोलनात सहभागी होण्यासाठी धोप येथील आपल्या घरून निघाले. मात्र, वाटेतच त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला. त्यांना ताबडतोब भंडारा येथे नेण्यात आले. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने कंत्राटी वाहनचालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. याची माहिती कंन्नाट घेतलेल्या मध्यप्रदेश राज्यातील भोपाल येथील अश्कोम मीडिया प्रा. लिमिटेड या कंपनीला कळताच कंपनीने तात्काळ कंपनीच्या मुख्य व्यवस्थापकांना आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी पाठविले.

त्यानंतर व्यवस्थापकाने चालकांच्या मागण्या पूर्ण करण्याचे लेखी पत्र दिले. दरम्यान, कंपनीने दुर्लक्ष न करता चालकांच्या मागण्यांकडे आधीच लक्ष दिले असते तर प्रेमभाऊ पिकलमुंडे या वाहन चालकाला आपला जीव गमवावा लागला नसता. त्याचबरोबर, वाहनचालकांच्या आंदोलनाचा गर्भवती महिला व बालकांना देखील फटका बसला नसता.

हेही वाचा- जलाशयाचे पाणी शेतात शिरल्याने ८० एकरातील धानाची नासाडी

Intro:Repoter : - OM PRAKASH SAPATE 
Mobil No. :- 9823953395
Date :- 26-11-2019
Feed By :- Reporter App
District :- gondia
File Name :- mh_gon_26.nov.19_andolan_7204243
मृत्यु नंतर कंपनी ला आला जाग  
आंदोलनकर्त्याचा हृदयविकाराने मृत्यु 
Anchor :- आरोग्य विभागातील १०२ रूग्णवाहिकांच्या कंत्राटी वाहनचालकांनी वेतनाच्या मागणीसाठी गोंदिया येथील जिल्हा परिषदेसमोर बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते. या आंदोलना सहभागी झालेल्या मृतक वाहनचालकाचा हृदयविकाराच्या तीव्र धक्याने मृत्यु झाला. ही घटना आज, सोमवारी घडली. प्रेमभाउ पिकलमुंडे असे मृताचे नाव असुन. तो भंडारा जिल्ह्यातील धोप येथील रहिवासी होता. मृतक मुंडीकोटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वाहनचालक म्हणुन कार्यरत होते. गर्भवती महिला व लहान मुलांना रूग्णसेवा देता यावी, यासाठी आरोग्य विभागाकडुन १०२ रूग्णवाहिका सेवा पुरविली जाते. मात्र, शासनाने कंत्राट दिलेली कंपनी रूग्णवाहिका चालकांना वेळेवर व नियमानुसार वेतन देत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ७८ रूग्णवाहिाकांच्या चालकांनी १८ नोव्हेंबरपासुन जिल्हा परिषदेसमोर कामबंद आंदोलनाला सुरवात केली आहे. 
VO :- गर्भवती महिलेला रुग्णालयात दाखल करण्यासाठी अथवा लहान मुलाना आरोग्य सेवा पुरविता यावी याकरीता रुग्णालयात सोडून देण्यासाठी १०२ ही टोल फ्री क्रमांकाची सेवा पुरण्यिात आली आहे़ तर याचे कंत्राट मध्यप्रदेश राज्यातील भोपाल येथील अश्कोम मिडीया प्रा़. लिमीटेड या कंपनीला देण्यात आले आहे़. मात्र या कंपनी च्या विरोधात चालकांनी आंदोलन पुकारला असुन या आंदोलनाला आठवडा लोटुनही कोणताही तोडगा निघाला नसल्याने वाहनचालकांनी आंदोलन सुरूच ठेवले. मृतक प्रेमभाउ पिकलमुंडे हे संपात सहभागी होते काही कारणा निमित्त एक दिवसा करीत घरी गेले असता सोमवारी आंदोलनात सहभागी होण्यासाठी धोप येथील घरून निघाले. मात्र, वाटेतच  त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला. त्यांना ताबडतोब भंडारा येथे नेत असतानाच त्यांचा वाटेत मृत्यु झाला. या घटनेने कंत्राटी वाहनचालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. याची माहिती कंत्राट दार मध्यप्रदेश राज्यातील भोपाल येथील अश्कोम मिडीया प्रा़. लिमीटेड या कंपनीला कळताच कंपनीने तात्काळ कंपनीच्या मुख्य व्यवस्थापक यांना आंदोलन सुरु असताना पाठविण्यात आले व चालकांच्या मागण्या पूर्ण करण्याचे लेखी पत्र हि दिले.
BYTE :- अंशुल बर्डे (मुख्य व्यवस्थापक, अश्कोम मिडीया प्रा़. लिमीटेड या कंपनी)निळा शर्ट घातलेला 
BYTE :- शेखर चंद्रिकापुरे (संघटन अध्यक्ष)  लायनीग लायनीग वाला पांढरा शर्ट घातलेला 
VO :- गर्भवती महिला व मुलांना रूग्णसेवा देता यावी, यासाठी १०२ रूग्णवाहीका सेवा पुरविली जाते. मात्र, कंत्राट देण्यात आलेली मध्य प्रदेशमधील भोपाळ येथील कंपनी नियमानुसार वेतन देत नसल्याने वाहनचालाकांनी कामबंद आंदोलन पुकारले होते. मात्र आठवडाभरापासुन हे आंदोलन सुरूच होता. त्यामुळे याचा फटका गर्भवती महिला व बाल रूग्णांना बसत होता तसेच एका चालकाला आपले जीव गमवावे लागले आहे. 
BYTE :- मुनेश राहांगडाले (आमदार चे प्रतिनिधी)Body:VO :- Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.