ETV Bharat / state

गुटख्यावरून दोन मित्रांमध्ये भांडण; धारदार शस्त्राने वार करत तरुणाची हत्या - gondiya crime news

गुटखा न दिल्याने दोन मित्रामध्ये भांडण होऊन एकाने धारधार शस्त्राने वार करत दुसऱ्याचा खून केल्याची घटना गोंदियातील गोरेगाव येथे घडली आहे. विकास उर्फ विक्की नरेश कटरे (वय 22) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

a man klilled his friend over the quarrel in gondiya
गुटखा न दिल्याने दोन मित्रामध्ये भांडण; धारदार शस्त्राने वार करत एकाने केला दुसऱ्याचा खून
author img

By

Published : Aug 3, 2020, 1:29 PM IST

गोंदिया - गुटखा न दिल्याने दोन मित्रामध्ये भांडण होऊन एकाने धारधार शस्त्राने वार करत दुसऱ्याचा खून केल्याची घटना गोरेगाव येथे घडली आहे. विकास उर्फ विक्की नरेश कटरे (वय 22), असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेतले आहे.

गोरेगाव येथील ज्योतिबा फुले नगर येथील रहिवासी मृत विकास हा शेतमजूरचे काम करीत होता. शनिवारी सायंकाळी 7 वाजता तो भाऊ आकाश नरेश कटरेसोबत परिसरातील पानटपरीवर गेला होता. पानटपरीवर विक्कीने गुटखा विकत घेतला. त्यावेळी आकाश त्याच्यासोबत होता. दोन्ही भावांनी गुटखा खाल्ल्यानंतर ते घराच्या दिशेने निघाले. विक्की हा पुढे निघून गेला, तर आकाश हा मोबाईल खेळत मागे-मागे येत होता. दरम्यान, विक्की हा मित्र उमेश मेश्राम याच्या घराजवळून जात असताना मित्र उमेशने त्याच्याकडे गुटख्याची मागणी केली. विक्कीने देण्यास नकार दिल्याने दोघांमध्ये वाद झाला. संतापलेल्या उमेशने घरातून धारदार शस्त्र आणत विक्कीच्या हातावर वार करत त्याला जखमी केले. याबद्दल विक्कीने भावाला माहिती देताच त्याने स्थानिकांच्या मदतीने त्याला गोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले मात्र, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी उमेश मेश्रामवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाळ देशमुख करीत आहे.

हेही वाचा - अनलॉक गुन्हेगारी... सोलापुरात भर बाजारातून दीड लाखांची बॅग लंपास, मंगळसूत्र हिसकावले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.