ETV Bharat / state

गोंदिया जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा शिरकाव; एक पॉझिटिव्ह, २० संशयितांवर नागपुरात उपचार सुरू

कोरोना संसर्गातून बरे होत असताना दुसरीकडे ब्लॅक फंगस(म्युकरमायकोसिस) या आजाराचे नवीन आव्हान जिल्हाप्रशासनापुढे उभे राहिले आहे. म्युकरमायोकसिस या बुरशीजन्य आजाराचा शिरकाव जिल्ह्यात झाला आहे. जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयात ब्लॅक फंगस या आजाराने ग्रस्त रुग्णाची नोंद झाली आहे. तसेच वीसहून अधिक संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे.

गोंदिया जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा शिरकाव

author img

By

Published : May 19, 2021, 7:30 AM IST

गोंदिया - देशावर कोरोना महामारीचे संकट गडद झाले असतानाच आता ब्लॅक फंगस (म्युकरमाकोसिस) या बुरशीजन्य संसर्गाने डोकेवर काढले आहे. विशेष म्हणजे, विदर्भात या आजाराचे रुग्ण वाढत असल्याचे चित्र आहे. त्यात गोंदिया जिल्ह्यातही ब्लॅक फंगसचा आजार झालेल्या एका रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 20 संशयित रुग्ण आढळले आहेत. यातील बहुतांश रुग्णांवर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, म्युकरमायकोसिसचा गोंदियात शिरकाव झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. तसेच या बुरशीचा संसर्ग वाढण्याचा धोका असल्याने जिल्हा प्रशासनासह नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.

गोंदिया जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा शिरकाव

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये घट होऊ लागली आहे. तसेच कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढू लागली आहे. त्यामुळे नागरिकांसह प्रशासनाला थोडासा दिलासा मिळाला आहे. मात्र, कोरोना संसर्गातून बरे होत असताना दुसरीकडे ब्लॅक फंगस(म्युकरमायकोसिस) या आजाराचे नवीन आव्हान जिल्हाप्रशासनापुढे उभे राहिले आहे. म्युकरमायोकसिस या बुरशीजन्य आजाराचा शिरकाव जिल्ह्यात झाला आहे. जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयात ब्लॅक फंगस या आजाराने ग्रस्त रुग्णाची नोंद झाली आहे. तसेच वीसहून अधिक संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे.

काय आहे ब्लॅक फंगस -

कोरोना विषाणूने बाधित होऊन बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये त्यानंतरही हृदय, फुफ्फुसे, मूत्रपिंडं, मेंदू अशा महत्त्वाच्या अवयवांच्या कार्याशी निगडीत अनेक शारीरिक व्याधी उद्भवत असल्याचे दिसून येत आहे. त्यामध्येच राज्यात ‘म्युकरमायकोसिस’या आजाराचे अनेक रुग्ण गेल्या महिन्यात आढळून आले. वैद्यकीय शास्त्राला पूर्वीपासून ज्ञात असलेला हा आजार ‘ब्लॅक फंगस’ किंवा ‘काळी बुरशी’या नावानं ओळखला जातो. आजपर्यंत तसा दुर्मिळ असा हा विकार सर्वसामान्य जनतेला परिचित नसल्याने त्याबाबत एक सर्वव्यापी उत्सुकता आणि अकारण भय निर्माण झाले असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले.

कुणाला होतो हा आजार?

प्रत्येक कोरोनाबाधित व्यक्तीला हा आजार होईलच असे नाही, तसेच मधुमेह असलेल्या आणि कोरोना झाल्यास त्या रुग्णास स्टेरॉइड्स दिलेले असले, तरीदेखील अशा प्रत्येक रुग्णाला हा आजार होत नाही. कोणत्याही कारणाने ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली आहे, अशा व्यक्तींना हा बुरशीजन्य जंतूंचा संसर्ग होतो. मधुमेहासारख्या आजारांमध्ये रुग्णाची प्रतिकारप्रणाली आधीपासूनच मंदावलेली असते. त्यात कोरोनाबाधित झाल्यावर विषाणूंच्या संसर्गामुळे त्या प्रतिकारप्रणालीवर ताण येतो. या रुग्णांची प्रतिकारप्रणाली स्टेरॉइड्समुळे आणखी दबली जाते. या परिस्थितीत या बुरशीजन्य विषाणूचा संसर्द होण्याची शक्यता असल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.