गडचिरोली - समाजामध्ये दहशत पसरवण्यासाठी मंगळवारी नक्षलवाद्यांनी भामरागड-आलापल्ली मार्गावरील ताडगावजवळ रस्त्याच्या मधोमध बॅनर व डमी भूसुरुंग लावला होता. परंतु, नक्षलवाद्यांचे मनसुबे ताडगाव येथील महिला व विद्यार्थिनींनी उधळून लावले आहेत. लावलेले नक्षल बॅनर काढून त्यांची होळी केली आहे.
नक्षलवाद्यांनी आठ मार्चला, महिला दिन साजरा करण्यासाठी दहशत पसरवणारा मजकूर व डमी भूसुरुंग लावून परिसरात दहशत पसरवण्याचा नक्षलवाद्यांचा मानस होता. परंतु, ताडगाव पंचक्रोशीतील महिला व विद्यार्थिनींनीच नक्षलवाद्यांचे आवाहन झुगारून लावत नक्षलींचे बॅनर जाळत चांगलीच चपराक लगावली आहे. नक्षलवादी हे आदिवासी बांधवांच्या डोळ्यात नेहमीच धुळफेक करून दुटप्पी भूमिका घेत असल्याचे यावेळी महिलांनी सांगितले.
नक्षलवादी हे अल्पवयीन मुलींचा देशविघातक कृत्यांसाठी करत असलेला वापर थांबवावा, असे आवाहन महिलांनी केले आहे. यावेळी बेबी मडावी जिंदाबाद, नक्षलवादी मुर्दाबादच्या घोषणा देत उपस्थित महिलांनी तीव्र शब्दात नक्षलवाद्यांचा निषेध केला. त्याचबरोबर नक्षलवाद्यांच्या कोणत्याही धमकीला आम्ही बळी पडणार नसल्याचे महिलांनी ठणकावून सांगितले. आजपर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील २२ निरापराध महिलांचे खून नक्षलवाद्यांनी केले आहेत.
हेही वाचा -