ETV Bharat / state

गडचिरोलीत वाघाच्या हल्ल्यात महिला ठार; आठवडाभरातील दुसरी घटना - गडचिरोलीत वाघाचा सुळसुळाट

गडचिरोली लगतच्या गोगाव जंगल परिसरात शुक्रवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास जंगलात गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला केल्याने ती महिला जागीच ठार झाली. गेल्या आठवडाभरात दोन घटना घडल्या आहेत.

गडचिरोलीत वाघाच्या हल्ल्यात महिला ठार; आठवडाभरातील दुसरी घटना

author img

By

Published : Dec 25, 2020, 4:25 PM IST

Updated : Dec 25, 2020, 7:30 PM IST

गडचिरोली - सरपण गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला केल्याने ती महिला जागीच ठार झाली. गडचिरोली लगतच्या गोगाव जंगल परिसरात शुक्रवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. मंजुळा चौधरी (60) असे मृत महिलेचे नाव आहे. आठवडाभरात ही दुसरी घटना असून या घटनेने नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. चार दिवसांपूर्वीच गडचिरोली शहरालगतच्या चांदाळा मार्गावर जंगलात सरपणासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले होते.

गडचिरोली शहरालगत चामोर्शी, धानोरा, आरमोरी मार्गावर झुडपी जंगल आहे. या जंगल परिसरात गेल्या काही दिवसांपासून अनेक नागरिकांना वाघाचे व बिबट्याचे दर्शन होत आहे. त्यामुळे वन विभागाने चारही मार्गावर फलक लावून सावधानतेचा इशारा दिला आहे. तरीही काही महिला सरपण गोळा करण्यासाठी जंगलात जातात. त्यामुळेच गेल्या आठवडाभरात दोन घटना घडल्या आहेत.

खासदार-आमदारांच्या निर्देशांकडे दुर्लक्ष-

चार दिवसांपूर्वी चांदाळा मार्गावर जंगल परिसरात वाघाने हल्ला करून महिलेला ठार केले. या घटनेनंतर खासदार अशोक नेते, आमदार देवराव होळी यांनी त्या वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याचे निर्देश वन विभागाला दिले होते. मात्र, अद्यापही तो वाघ वन विभागाच्या हाती लागलेला नाही. विशेष म्हणजे, त्या वाघाला कॉलर आयडी नसल्याने त्याचा वावर कोणत्या परिसरात आहे, हे अद्यापही वन विभागाला जाणून घेता आलेले नाही. त्यामुळे हल्याच्या घटना घडत आहेत.

हेही वाचा - नव्या कृषी कायद्यांसंदर्भात चर्चेसाठी केंद्र सरकारकडून शेतकरी नेत्यांना पुन्हा आमंत्रण

Last Updated : Dec 25, 2020, 7:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.