गडचिरोली - आलापल्ली-पेरमिली मार्गावरील मेडपल्ली गावाजवळ आज सकाळी ११ वाजता भीषण अपघात घडला. यात ३ जण जागीच ठार तर सात जण गंभीर जखमी झाले.
आलापल्ली-पेरमिली मार्गावरील मेडपल्ली गावाजवळ दोन भरधाव वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले. मृतांमध्ये १ पुरुष व २ महिलांचा समावेश आहे. कोमा बंडू लेकामी (४३), झुरी दस्सा गावडे (७०) व चुक्को करपा आत्राम (७०) सर्व, रा. कोळसेपल्ली, अशी मृतांची नावे आहेत.
मासा पेंटा तलांडी (४५), ढोबी केसा आत्राम (७०), चिना इरपा तलांडी (७०), बाबाजी गोंगले (७०) सर्व रा. कोळसेपल्ली व पोचा जोगी तलांडी (५५) रा.पालेकसा हे जखमी झाले आहेत. जखमींना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.