ETV Bharat / state

तेलंगाणाचे आमदार कोनेरू कोणप्पा यांनी प्राणहिता नदीवरील गुडेम-अहेरी पुलाची केली पाहणी - प्राणहीता नदी

तेलंगाणाचे आमदार कोनेरू कोणप्पा यांनी प्राणहिता नदीवरील गुडेम-अहेरी पुलाची पाहणी केली. या पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या एक ते दीड महिन्यात पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल.

तेलंगाणाचे आमदार कोणेरू कोणप्पा
तेलंगाणाचे आमदार कोणेरू कोणप्पा यांनी प्राणहीता नदीवरील गुडेम-अहेरी पुलाची केली पाहणी
author img

By

Published : May 17, 2020, 10:28 AM IST

गडचिरोली - अहेरी येथून जवळ असलेल्या महाराष्ट्र सीमेवर वांगेपली गावलागत प्राणहिता नदीवर महाराष्ट्र व तेलंगाणा राज्याला जोडणाऱ्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. याठिकाणी तेलंगाणाचे सिरपूर कागजनगर आमदार कोणेरु कोणप्पा यांनी भेट दिली. त्यांनी बांधकामाची पाहणी करत कामाचा आढावा घेतला.

तेलंगाणाचे आमदार कोणेरू कोणप्पा तेलंगाणाचे आमदार कोणेरू कोणप्पा
तेलंगाणाचे आमदार कोणेरू कोणप्पा यांनी प्राणहिता नदीवरील गुडेम-अहेरी पुलाची केली पाहणी

या पुलाचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. या पुलाचे काम झाल्यानंतर एक-दीड महिन्यातच हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल. या पुलामुळे आणि रस्त्यामुळे दोन्ही राज्यांतील नागरिकांना वाहतूक आणि इतर वाणिज्य व्यवहार सोपे होतील, असे मत आमदार कोणप्पा यांनी व्यक्त केले. यावेळी तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या प्रतिमेला दुधाभिषेक करून मिठाई वाटण्यात आली.

तेलंगाणाचे आमदार कोणेरू कोणप्पा
तेलंगाणाचे आमदार कोणेरू कोणप्पा यांनी प्राणहीता नदीवरील गुडेम-अहेरी पुलाची केली पाहणी

महाराष्ट्र तेलंगाणा राज्यांची सीमा रेषा म्हणजे प्राणहिता नदी आहे. नदीच्या पलीकडे कोमुरमभीम (आसिफाबाद) जिल्हा तर अलीकडे अहेरी आहे. दक्षिण गडचिरोलीतील प्राणहिता नदीवर पूल नसल्याने तेलंगाणातील गुडेम कवटाला, सिरपूर, कागजनगर, मंडल परिसारातील नागरिकांना अहेरी, गडचिरोलीला जाण्यासाठी जवळपास २०० किलोमीटरचे अंतर फिरून राजुरा बल्लारपूर मार्गे यावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन तेलंगाणा सरकारने गुडेम व महाराष्ट्रतील अहेरी जवळच्या वांगेपल्ली गावालगत प्राणहिता नदीवर पुलाचे बंधकाम हाती घेतले. या पुलाचे ९० टक्के काम पबर्ण झाले आहे.

तेलंगाणाचे आमदार कोनेरू कोणप्पा यांनी प्राणहुता नदीवरील गुडेम-अहेरी पुलाची केली पाहणी

एक-दीड महिन्यात हा पुल वाहतुकीसाठी खुला झाल्यास तेलंगाणा व महाराष्ट्र दोन्ही राज्यातील मंचेरियाल, आसिफाबाद मार्गे महाराष्ट्रात प्रवेश करत अहेरी गडचिरोली जिल्हा तसेच छत्तीसगड राज्यातील राजनंदगावपर्यंतचे अंतर कमी होईल. दक्षिण गडचिरोली भागातील एटापल्ली, मुलचेरा, भामरागड येथील दुर्गम भागातील लोकांसाठी बल्लारपूर रेल्वे जंक्शनपेक्षा सिरपूर-कागजनगर रेल्वे स्थानकाचे अंतर कमी होईल, असे मत आमदार कोनेरु कोणप्पा यांनी व्यक्त केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.