ETV Bharat / state

गडचिरोलीत 19 जणांची कोरोनावर मात; तीन वर्षाच्या मुलाचा समावेश - गडचिरोली लेटेस्ट न्यूज

शनिवारी 19 जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये तीन वर्षाच्या बालकाचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 254 वर पोहोचली आहे. सध्या 255 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Gadchiroli corona update
गडचिरोली कोरोना अपडेट
author img

By

Published : Jul 26, 2020, 8:52 AM IST

गडचिरोली- जिल्ह्यात शनिवारी 19 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना दवाखान्यातून घरी सोडण्यात आले. यामध्ये सिरोंचा येथील तीन वर्षाचा मुलाचा समावेश आहे.

सिरोंचा येथील तीन वर्षांचा मुलगा आई-वडिलांसह 15 जुलैला कर्नाटक येथून परतला होता. त्यापैकी मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मात्र, त्या मुलाने यशस्वीरित्या कोरोनावर मात केल्याने त्याला दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आला. इतरांमध्ये सीआरपीएफ गडचिरोली येथील 16 जवान, एक एसआरपीएफ जवान व भामरागड येथील एका युवकाचा समावेश आहे.

शनिवारी सकाळी 67 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर आणखी 2 दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये चामोर्शी जयरामपूर येथील एक महिला व सिरोंचा येथील एका पुरुषाचा समावेश आहे.

जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 254 आहे. 255 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या 510 झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.