गडचिरोली - जिल्ह्यात आज (शुक्रवारी) 283 कोरोना रुग्णांनी कोरोनावर मत केली. तर 15 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 497 नव्या रुग्णांची भर झाली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत 13 हजार 56 रुग्ण बरे झाले आहे. तसेच सद्या 4 हजार 82 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.
आत्तापर्यंत एकूण 295 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 15 जणांचा मृत्यू झाला. मृत्यूमध्ये 67 वर्षीय महिला ब्रम्हपूरी जि.चंद्रपूर, 67 वर्षीय पुरुष जि.चंद्रपूर , 54 वर्षीय पुरुष नवेगाव, गडचिरोली, 65 वर्षीय महिला आरमोरी, 34 वर्षीय पुरुष पोलीस कॉलनी गडचिरोली, 59 वर्षीय पुरुष विवेकांनद नगर गडचिरोली, 40 वर्षीय पुरुष वडसा, 54 वर्षीय पुरुष कुरखेडा, 65 वर्षीय महिला वडसा, 72 वर्षीय पुरुष विसारा ता.वडसा, 69 वर्षीय पुरुष आरमोरी, 52 वर्षीय पुरुष अहेरी, 44 वर्षीय पुरुष आमगाव ता.वडसा, 33 वर्षीय महिला चंद्रपूर, 40 वर्षीय पुरुष रामनगर गडचिरोली यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 74.89 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 22.42 टक्के तर मृत्यू दर 1.69 टक्के इतका आहे.
या तालुक्यात नवे बाधित
नवीन 497 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 157, अहेरी तालुक्यातील 26, आरमोरी 55, भामरागड तालुक्यातील 0, चामोर्शी तालुक्यातील 57, धानोरा तालुक्यातील 35, एटापल्ली तालुक्यातील 23, कोरची तालुक्यातील 29, कुरखेडा तालुक्यातील 39, मुलचेरा तालुक्यातील 25, सिरोंचा तालुक्यातील 09 तर वडसा तालुक्यातील 42 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 283 रूग्णांमध्ये गडचिरोलीमधील 138, अहेरी 06, आरमोरी 25, भामरागड 05, चामोर्शी 11, धानोरा 08 , एटापल्ली 10, मुलचेरा 02, सिरोंचा 3, कोरची 12, कुरखेडा 19, तसेच वडसा येथील 44 जणांचा समावेश आहे.