ETV Bharat / state

गडचिरोली : आरमोरीत दगडं पडण्याच्या प्रकारामुळे भुताची अफवा, नागरिकांमध्ये गोंधळ

आरमोरीच्या आझाद चौकात गेल्या आठ दिवसांपासून रात्री दगडं पडण्याची घटना घडत आहे. हे दगड कोण फेकतो, याचा अजून पत्ता लागलेला नाही. मात्र, हे सगळं भूत करीत असल्याच्या अफवेने येथे गोंधळ उडाला आहे.

भूत
author img

By

Published : Jul 18, 2019, 12:04 PM IST

Updated : Jul 18, 2019, 12:41 PM IST

गडचिरोली - जिल्ह्यातील आरमोरीच्या आझाद चौकात गेल्या आठ दिवसांपासून रात्री दगडं पडण्याची घटना घडत आहे. हे दगड कोण फेकतो, याचा अजून पत्ता लागलेला नाही. मात्र, हे सगळं भूत करीत असल्याच्या अफवेने येथे गोंधळ उडाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे.

गावात भुताचे थैमान

रात्री अकरा-बारा वाजण्याच्या सुमारास हे दगड पडतात. ते कुणाला दिसतात? तर अनेकांना दिसतही नाहीत. पण हे दगड आणि कथित भूत बघण्यासाठी लोक चौकात मोठी गर्दी करीत आहेत. हा प्रकार गेल्या आठ दिवसांपासून सुरू आहे. या चौकात एक मोठी इमारत आहे. याच इमारतीतून हे दगड येत असावे, अशी शंका लोकांना होती. त्यामुळं शोध घेण्यासाठी या इमारतीवर चढून लोक धिंगाणा घालू लागले. या त्रासापायी इमारतीतील कुटुंब दुसरीकडे राहायला गेले आहे.

पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी चौकात मोठे लाईट लावले, गस्त सुरू केली आणि शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण हाती काहीच लागलेलं नाही. पण तरीही तिथं भूत असावं, अशी चुकीची समजूत लोकांनी करून घेतली आहे. हा सगळा प्रकार खोडसाळपणाचा असून कुणीतरी या लोकांची मजा घेत असावे, असे सुज्ञ लोकांचे म्हणणे आहे. मात्र, या कथित भूत प्रकाराने पंचक्रोशीत एका नव्या चर्चेला उधाण आले आहे.

Intro:धक्कादायक.... दगडं फेकत भूतान गोंधळ घातलंय !

गडचिरोली : जिल्ह्यातील आरमोरी या तालुकास्थळी गेल्या आठ दिवसांपासून भूतानं गोंधळ घातलाय. आरमोरीच्या आझाद चौकात रात्री दगड येवून पडतात. हे दगड कोण फेकतो, याचा अजून पत्ता लागलेला नाही. मात्र हे सगळं भूत करीत असावा, असा गैरसमज करून येथील नागरिकांनी कांगावा सुरू केलाय. त्यामुळं नागरिक प्रचंड भयभीत आहेत.Body:रात्री अकरा-बाराच्या सुमारास हे दगड पडतात. ते कुणाला दिसतात, तर अनेकांना दिसतही नाही. पण हे दगड आणि कथित भूत बघण्यासाठी लोक चौकात मोठी गर्दी करीत आहेत. हा प्रकार गेल्या आठ दिवसांपासून सुरू आहे. याच चौकात एक मोठी इमारत आहे. याच इमारतीतून हे दगड येत असावे, अशी शंका लोकांना होती. त्यामुळं शोध घेण्यासाठी या इमारतीवर चढून लोक धिंगाणा घालू लागले. या त्रासापायी इमारतीतील कुटुंब दुसरीकडे राहायला गेलं आहे.

पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी चौकात मोठे लाईट लावले, गस्त सुरू केली आणि शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण हाती काहीच लागलेलं नाही. पण तरीही तिथं भूत असावं, अशी चुकीची समजूत लोकांनी करून घेतली आहे. यामुळेच येथे बरात्री जागली केली जात आहे. हा सगळा प्रकार खोडसाळपणा असून, कुणीतरी या लोकांची मजा घेत असावा, असं सुज्ञ लोकांचं म्हणणं आहे. मात्र या कथित भुताने पंचक्रोशीत एका नव्या चर्चेला उधाण आलं आहे.Conclusion:सोबत व्हिज्युअल आहेत
Last Updated : Jul 18, 2019, 12:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.