गडचिरोली - जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात नक्षलग्रस्त अतिदुर्गम अशी संवेदनशील भागात पोलीस जवानांनी आदिवासी लोकांसोबत दिवाळी साजरी केली. एकीकडे बंदुक हातात घेऊन 24 तास नक्षलवाद्यांसोबत लढा देत दुर्गम भागात हे जवान तैनात राहतात. तर कधी हातात कुदळ फावडे घेऊन रस्ता दुरुस्तीसाठी सामाजिक कार्यात सहभागी होतात. याच कामाची दखल घेत हीतापाडी येथील आदिवासी ग्रामस्थांसोबत दिवाळी साजरी केली.
आदिवासी लोकांना फराळाचे वाटप
भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व असलेला दिवाळीचा सण म्हणजे संपन्नता समृध्दी आणि आनंदाचे प्रतीक. मात्र, जंगलातील डोंगराळ भागात राहणाऱ्या आदिवासी लोकांना दोन वेळा अन्नासाठी धडपड करावी लागते. या दिवाळीत जवान कुटुंबापासून दूर राहत देशाची सेवा बजावतात. त्यामुळे त्यांनी यंदा या आदिवासी लोकांसोबत दिवाळी सोबत करण्याचे ठरवले. गडचिरोली पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांची ही संकल्पना सर्वांनी उचलून धरली. भामरागड येथील उपविभागीय अधिकारी कुणाल सोनवणे, पो.नि.किरण रासकर, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बोसले,संघमित्रा बांबोळे यांच्यासह जवानांनी गावकऱ्यांसाठी फराळ, गोड पदार्थ, नवीन कपडे, फटाके यांचे वाटप केले. गावकऱ्यांना फराळ, लाडू, चिवडा याचबरोबर लहान मुलांना फटाके पेन, टिफीन बॉक्स, भांडे, ब्लॉंकेट, बेडशीट यांचे वाटप केले. दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा - अनिल देशमुखांना पुन्हा ईडी कोठडी की जामीन? आज फैसला!