गडचिरोली - गोसीखुर्द धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने जिल्ह्यातून वाहणारी वैनगंगा नदी पात्रात पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे अनेक उपनद्यांनाही पूर आला आहे. त्यामुळे गडचिरोली-हैदराबाद, गडचिरोली-नागपूर, आष्टी-चंद्रपूर हे प्रमुख राष्ट्रीय महामार्ग मंगळवारी सकाळपासूनच बंद आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा - शिवस्वराज्य यात्रेत बाबा आत्राम अनुपस्थित; भाजपमध्ये जाणार असल्याच्या अफवांना पेव
मध्यप्रदेशात झालेल्या मुसळधार पावसामुळे संजय सरोवराचे पाणी गोसेखुर्द धरणात सोडण्यात आले आहे. तर गोसीखुर्द धरणाचे पाणी वैनगंगा नदीला सोडण्यात आले. गोसीखुर्द धरणाचे सर्व दरवाजे 2 मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातून वाहणारी वैनगंगा नदी फुगली असून या नदीमुळे अनेक उपनद्याही पूर आला आहे. परिणामी 3 प्रमुख राष्ट्रीय महामार्ग बंद पडले आहे.
हेही वाचा - भामरागडमधील पूर ओसरला ; श्रमदानातून स्वच्छतेची कामे सुरू
गडचिरोली-नागपूर मार्गावरील पाल नदी, गडचिरोली-हैदराबाद मार्गावरील पोटफोडी नदी व चंद्रपूर मार्गावरील वैनगंगा नदीवरील पुलावर पाणी चढल्याने सकाळपासूनच तीनही मार्ग बंद आहेत. आता ही पाण्याची पातळी वाढत असून सायंकाळपर्यंत पूर ओसरण्याची कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे प्रशासनाने पुलाच्या ठिकाणी सुरक्षेच्यादृष्टीने पोलीस बंदोबस्त लावून बॅरिकेट्स लावले आहेत. देण्यात आला आहे.