ETV Bharat / state

आबूजमाड जंगलातील बीनागुंड्यात पहिल्यांदाच पोहोचले जिल्हा आरोग्य अधिकारी; वृद्ध बडामाडिया आदिवासींची केली तपासणी

author img

By

Published : May 27, 2020, 4:17 PM IST

Updated : May 27, 2020, 4:42 PM IST

नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला म्हणून आबूजमाड पहाडी परिसराची विशेष ओळख आहे. भामरागड तालुका मुख्यालयापासून 36 किमी अंतरावर हा आबूजमाड डोंगराच्या रांगा आहेत. या डोंगराच्या रांगात पहिल्यांदाच जिल्हा आरोग्य अधिकारी पोहोचले.

chi
वृद्धेची तपासणी करताना डॉ. शंभरकर

गडचिरोली - अतिमागास आणि अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भाग म्हणून आबूजमाड पहाडी परिसर ओळखला जातो. या पहाडावरील बीनागुंड्यातील आरोग्य उपकेंद्राला रविवारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशीकांत शंभरकर यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी बीनागुंडा, फोदेवाडा, तुर्रेमरका गावातील बडामाडिया आदिवासी बांधवांची मान्सून पूर्व आरोग्य तपासणी व औषधोपचार केले. पावसाळ्यात या परिसराचा संपर्क तुटत असल्याने याबाबत पूर्व नियोजनही केले. बीनागुंडासारख्या ठिकाणी दौरा करणारे डॉ. शंभरकर हे पहिले जिल्हा आरोग्य अधिकारी आहेत, हे विशेष.

आबूजमाड जंगलातील बीनागुंड्यात पहिल्यांदाच पोहोचले जिल्हा आरोग्य अधिकारी; केली वृद्ध बडामाडीया आदिवासींची तपासणी

आबूजमाड नाव ऐकातच अंगावर शहारे उभे राहतात. आबूजमाड जंगलपरिसर (पर्वतरांगा) हा महाराष्ट्र, छत्तीसगढ राज्याच्या सीमेवर आहे. नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला म्हणून या परिसराची विशेष ओळख आहे. भामरागड तालुका मुख्यालयापासून 36 किमी अंतरावर हा आबूजमाड डोंगराच्या रांगा आहेत. या पहाडावर जाण्यासाठी भामरागडपासून 18 किमी अंतर लाहेरीपर्यंत रस्ता आहे. त्यानंतर 18 किमी अंतर गाठण्यासाठी सात-आठ किमी पहाड चढून पायी जावे लागते. त्यानंतर आपण बीनागुंड्यात पोहोचतो.

बीनगुंडा परिसारात फोदेवाडा, तुर्रेमरका, कुवकोडी, धामनमरका, पुंगासूर व पेरमिलीभट्टी आदी सात गावे आहेत. या सात गावांची लोकसंख्या 650 ते 700 पर्यंत आहे. या सातही गावात बडामाडिया आदिवासी बांधवांचे वास्तव्य आहे. दळण वळणाची सोय नाही, अशा ठिकाणी देखील आरोग्य सुविधा पोहोचवण्याचे दृष्टीने शासनाने बीनागुंडा, फोदेवाडा व कुवकोडी येथे आरोग्य उपकेंद्र उभारले आहे. त्या ठिकाणी आरोग्य सेविका, आरोग्य सेवक व आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून या भागातील नागरिकांना वर्षभर आरोग्य सुविधा पुरविल्या जतात. परंतु रस्त्याअभावी येथील नागरिकांना व आरोग्य कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

पावसाळ्यात घणदाट अरण्य बांबूंच्या रांजीतून पायवाटेने मार्ग कढावा लागतो. अस्वल हल्ल्याचा भीतीने आठ दहा लोकांशिवाय कोणाला प्रवास करने शक्य नाही. रस्ता मोठा नाल्यात गेल्यामुळे जून ते जानेवारीपर्यंत जवळपास आठ महिन्यापर्यंत वाहतूक संपर्क तुटतो. अशावेळी याभागातील नागरिकांच्या मान्सून पूर्वी आरोग्य तपासणी करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी शशिकांत शंभरकर यांनी आबूजमाड पहाडवरील बीनागुंड्यात भेटी देऊन तेथील आरोग्य विषयक समस्या जणून घेतल्या. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद मेश्राम व आरोग्य कर्मचारी सोबत होते.

नागरिकांना पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर काय काळजी घ्यावी, त्याची माहिती दिली. प्रामुख्याने गरोदर मातांना 6 व्या 7 व्या महिन्यापासून पावसाळ्यात येथे न ठेवता लाहेरी दवाखान्यात येऊन रहावे, आरोग्य सुविधा व जेवण्याची राहण्याची व्यवस्था होईल, असे माडीया भाषेत समजावून सांगण्यात आले. देशात उद्भवलेल्या कोरोना संदर्भात बोलून तुम्ही बाहेर गावी कामानिमित्ताने गेल्यास काय करावे, आशा वर्करकडून आपल्या भाषेत महिती घेऊन जावे, त्यादृष्टीने कोणत्या उपाययोजना कराव्या याविषयी आरोग्य कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.

गरोदर मातांची तपासणी, प्रसूती पूर्व नियोजन, कीटकजन्य आजारांविषय सर्व्हेक्षण, 0 ते 5 वर्षातील बाल मृत्यू कमी करण्याबाबत या समस्येवर कसे कार्य करतील, यावर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. जिल्ह्यात कोविड 19 च्या कामात व्यस्त असताना वेळ काढून पावसाळ्यापूर्वी नियोजन तेवढ्याच महत्त्वाचे समजून पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या गावांचे आरोग्य विषयावर भर देण्यासाठी अतिदुर्गम भागातील उपकेंद्रला भेट देण्यासाठी अतिसंवेदनशील भागात जोखीम घेऊन दौरा करणाऱ्या पहिला अधिकारी असल्याची महिती डॉ. मिलिंद मेश्राम यांनी दिली. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन व नवीन उर्जा मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Last Updated : May 27, 2020, 4:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.