ETV Bharat / state

आरमोरीत काँग्रेसच्या उमेदवारावर अपहरणाचा गुन्हा दाखल ; राजकिय क्षेत्रात खळबळ - aarmori assembly

गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बग्गुजी ताडाम यांचे काँग्रेसचे उमेदवार आनंद गेडाम यांनी अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली. त्यामुळे राजकिय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

अपक्ष उमेदवार बग्गुजी ताडाम
author img

By

Published : Oct 11, 2019, 12:53 AM IST

Updated : Oct 11, 2019, 1:00 AM IST

गडचिरोली - बुधवारी रात्री सुकाळा येथून नाटकाच्या उद्घाटनानंतर घरी परत येणाऱ्या आरमोरी विधानसभा क्षेत्रातील अपक्ष उमेदवार बग्गुजी ताडाम व त्यांच्या तीन सहकाऱ्यांचे अपहरण करण्यात आल्याची घटना घडली. या चौघांचे अपहरण याच मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आनंद गेडाम यांचा मुलगा लॉरेन्स व त्याच्या साथीदारांनी पाठलाग करून वैरागड-मनापुर फाट्यावर गाडी अडवून केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. अपक्ष उमेदवा व त्याच्या साथीदारांना रात्री सलंगटोला येथे थांबवण्यात आले. त्याठिकाणी काँग्रेसचे उमेदवार आनंद गेडाम हे स्वतः उपस्थित होते. त्यांनी बग्गुजी ताडाम यांना शिवीगाळ व मारपीट केली. तसेच उमेदवारी कायम ठेवली परंतु प्रचारातून माघार घेण्याची धमकी दिली, अशा आशयाची तक्रार बग्गुजी ताडाम यांनी आरमोरी पोलीस स्टेशन येथे गुरूवारी रात्री दाखल करण्यात आली.

काँग्रेसच्या उमेदवाराने केले अपक्ष उमेदवारासह तिघांचे अपहरण

आरमोरी पोलिसांनी काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार आनंद गेडाम व त्यांचा मुलगा लॉरेन्स आनंद गेडाम यांचेसह पंकज प्रभाकर तुलावी, जीवन नाट आणि इतर अशा एकूण दहा जणांवर अपहरणाचे कलम 365 यासह 341, 342, 392, 143, 147, 37(1),(3) अशी वेगवेगळी कलमे लावून गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने राजकिय क्षेत्रात प्रचंड खळबळ माजली आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात अशा प्रकारची अपहरणाची पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे. प्राप्त माहितीनुसार बग्गुजी ताडाम हे एकेकाळचे काँग्रेसचे स्थानिक नेते तत्कालीन आमदार आनंद गेडाम यांचे सहकारी होते. त्यांनी आरमोरी पंचायत समितीचे उपसभापती पद सुद्धा भोगले आहे. मधल्या काळात आनंद गेडाम आणि बग्गुजी ताडाम यांच्यात मतभेद झाल्याने त्यांनी आनंद गेडाम यांची साथ सोडली. विद्यमान विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे.

ताडाम यांची उमेदवारी ही आपल्याला घातक ठरू शकते हे जाणून आनंद गेडाम यांनी बग्गुजी ताडाम यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी खूप प्रयत्न केला. परंतु त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेस उमेदवार माजी आमदार आनंद गेडाम यांनी बुधवारी आपल्या मुलासह बग्गुजी ताडाम यांच्या अपहरणाचा कट रचला व अपहरण केले. मात्र बग्गुजींनी आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवून गोंडी भाषेचा प्रभावी वापर केला आणि समयसुचकता दाखवत कुटुंबीयांना मोबाईलवर आपले अपहरण झाल्याची सूचना देण्यात यशस्वी झाले.

बग्गुजी ताडाम यांच्या मुलाने गुरूवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास हातात भला मोठा दंडुका घेतला. तसेच आरमोरी पंचायत समितीच्या समोर बग्गुजी ताडाम यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना घेऊन भरधाव वेगाने येणारी गाडी थांबविली. व आपल्या वडिलांसह इतर तीनही सहकार्‍यांची सुटका करून घेतली. त्यानंतर सर्व अपह्रत आरमोरी पोलीस स्टेशनला गेले व तिथे त्यांनी आपली फिर्याद नोंदवली. आरमोरी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनात दिवसभर तपासाची चक्रे हलवीत रात्री उशिरा ही फिर्याद दाखल करून घेतली. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून पोलिस आरोपींचा तपास करीत आहेत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांनी दिली.

Intro:आरमोरीत काँग्रेसचे उमेदवार आनंद गेडाम व त्यांचा मुलगा लॉरेन्स यांचेसह दहा जणांवर गुन्हा दाखल

गडचिरोली : बुधवारी रात्री सुकाळा येथून नाटकाच्या उद्घाटनानंतर घरी परत येणाऱ्या आरमोरी विधानसभा क्षेत्रातील अपक्ष उमेदवार बग्गुजी ताडाम व त्यांच्या तीन सहकाऱ्यांचे, याच मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आनंद गेडाम यांचा मुलगा लॉरेन्स व त्याच्या साथीदारांनी पाठलाग करून वैरागड-मनापुर फाट्यावर गाडी अडवून अपहरण केले. व रात्री सलंगटोला येथे थांबवून तेथे काँग्रेसचे उमेदवार आनंद गेडाम हे स्वतः त्यात सामील होऊन बग्गुजी ताडाम यांना शिवीगाळ व मारपीट केली आणि ऊमेदवारी कायम ठेवली परंतु प्रचारातून माघार घेण्याची धमकी दिली, अशा आशयाची तक्रार बग्गुजी ताडाम यांनी आरमोरी पोलिस स्टेशन येथे गुरूवारी रात्री उशिरा पर्यंत नोंदविल्यानंतर आरमोरी पोलिसांनी काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार आनंद गेडाम व त्यांचा मुलगा लॉरेन्स आनंद गेडाम यांचेसह पंकज प्रभाकर तुलावी, जीवन नाट आणि इतर अशा एकूण दहा जणांवर अपहरणाचे कलम 365 यासह 341, 342, 392, 143, 147, 37(1),(3) अशी वेगवेगळी कलमे लावून गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने आरमोरी विधानसभा क्षेत्रातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकिय क्षेत्रात प्रचंड खळबळ माजली आहे. Body:गडचिरोली जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात अशा प्रकारची अपहरणाची पहिलीच घटना असल्याचे सांगितले जात आहे यावरून गडचिरोलीच्या भविष्यातील राजकारणाची दिशाही लक्षात येते . प्राप्त माहितीनुसार बग्गुजी ताडाम हे एकेकाळचे काँग्रेसचे स्थानिक नेते तत्कालीन आमदार आनंद गेडाम यांचे सहकारी होते. त्यांनी आरमोरी पंचायत समितीचे उपसभापती पद सुद्धा उपभोगले आहे . मधल्या काळात आनंद गेडाम आणि बग्गुजी ताडाम यांच्यात मतभेद झाल्याने त्यांनी आनंद गेडाम यांची साथ सोडली. विद्यमान विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला.

ताडाम यांची उमेदवारी ही आपल्याला घातक ठरू शकते हे जाणून आनंद गेडाम यांनी बग्गुजी ताडाम यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी खूप प्रयत्न केला. परंतु त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेस उमेदवार माजी आमदार आनंद गेडाम यांनी बुधवारी आपल्या मुलासह बग्गुजी ताडाम यांच्या अपहरणाचा कट रचला व अपहरण केले. मात्र बग्गुजींनी आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवून गोंडी भाषेचा प्रभावी वापर करीत समयसुचकता दाखवत घरी कुटुंबाला मोबाईलवर आपले अपहरण झाल्याची सूचना देण्यात यशस्वी झाले.

आणि इथूनच अपहरण नाट्याचा क्लायमॅक्स झाला . बग्गुजी ताडाम यांच्या मुलाने गुरूवारी सकाळी आठ साडे आठ वाजताच्या सुमारास हातात भला मोठा दंडुका घेऊन आरमोरी पंचायत समितीच्या समोर बग्गुजी ताडाम यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना घेऊन घेऊन भरधाव वेगाने येणारी गाडी थांबविली व आपल्या वडिलांसह इतर तीनही सहकार्‍यांची सुटका करून घेतली. त्यानंतर सर्व अपह्रत आरमोरी पोलीस स्टेशनला गेले व तिथे त्यांनी आपली फिर्याद नोंदवली. आरमोरी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनात दिवसभर तपासाची चक्रे हलवीत रात्री उशिरा ही फिर्याद दाखल करून घेतली . या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून पोलिस आरोपींचा तपास करीत आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांनी दिली.Conclusion:सोबत तक्रार करते बग्गुजी ताडाम यांचा बाईट व आरमोरी पोलीस ठाण्याचे व्हिडिओ आहेत
Last Updated : Oct 11, 2019, 1:00 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.