ETV Bharat / state

कोरोना लॉकडाऊन : विदर्भातील 36 विद्यार्थी अडकले मलेशियात - गडचिरोली जिल्हा बातमी

सर्व विद्यार्थी नागपूरच्या तिरपुडे हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजचे आहेत. हे विद्यार्थी 15 डिसेंबरला 6 महिन्याच्या प्रशिक्षणासाठी मलेशियाला गेले होते. अडकलेल्या विद्यार्थ्यांमध्ये गडचिरोलीतील प्रतीक्षा साळवे आणि सृष्टी बेहेरे या दोन विद्यार्थिनीसह नागपूरच्या तिरपुडे हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजचे 36 विद्यार्थी आहेत.

Lockdown
विदर्भातील 36 विद्यार्थी अडकले मलेशियात
author img

By

Published : Apr 11, 2020, 2:05 PM IST

गडचिरोली - नागपूर येथील महाविद्यालयात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत असलेले 36 विद्यार्थी प्रशिक्षणासाठी 6 महिन्यासाठी मलेशियाला गेले होते. मात्र, लॉकडाऊन झाल्याने तेथे अडकले आहेत. यामध्ये गडचिरोलीच्या 2 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी देशात परत येण्यासाठी पंतप्रधानांना विनंती केली आहे.

सर्व विद्यार्थी नागपूरच्या तिरपुडे हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजचे आहेत. हे विद्यार्थी 15 डिसेंबरला 6 महिन्याच्या प्रशिक्षणासाठी मलेशियाला गेले होते. अडकलेल्या विद्यार्थ्यांमध्ये गडचिरोलीतील प्रतीक्षा साळवे आणि सृष्टी बेहेरे या दोन विद्यार्थिनीसह नागपूरच्या तिरपुडे हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजचे 36 विद्यार्थी आहेत.

यामध्ये पियुष जोशी, अक्षय बावनकर, सौदामिनी भांड, रुचिका येरपुडे, अलिशा वेटके, निकिता दास, उन्नती ठोकर, अमित नानवटकर, प्रणव चंदेल, चिन्मय मुनिश्वर, रोनक जाधव, राज मौर्य, नरेश थापा, हर्षल पराते, हिमांशु वधाई, आयुष पटेल, शुभम मिश्रा, अजय पाल, वीर सिंह पवार, यश पाटिल, शुभम नागले, नोमन अहमद, जयेश घागरे, उद्देश गाडवे, कुणाल अळे, गौरव येदनुलवार, शितिज मेहर, शेखर देवसरकर, कलश महाजन, अयन शेख, नैमिश नवकार, सौरभ राजगुरू, निशांत मुटकुरे, ऋषी बोनदाळे यांचा समावेश आहे.

हे विद्यार्थी मलेशिया येथील ईपो आणि पेनांग या 2 शहरांमध्ये आहेत. यात 6 विद्यार्थिनी व 30 विद्यार्थी आहेत. मलेशियाच्या शहरांतील 2 फाईव्ह स्टार हॉटेलात त्यांचे प्रशिक्षण सुरू असताना अचानक लॉकडाऊन जाहीर झाले. लॉकडाऊनमुळे प्रशिक्षण कालावधी 4 महिन्यांवर आणत विद्यार्थ्यांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, त्याच काळात भारताने आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद केल्याने हे विद्यार्थी मलेशियात अडकले आहेत.

सध्या या विद्यार्थ्यांची स्थिती वाईट झाली आहे. ज्या ठिकाणी ते निवासाला आहेत तिथल्या खाण्याच्या सर्व वस्तू संपल्या आहेत. विद्यार्थ्यांजवळची रक्कम देखील संपली आहे. या विद्यार्थ्यांनी या संकटातून सोडविण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे. दरम्यान, तिरपुडे कॉलेजच्या प्राचार्यांनी पंतप्रधान मोदींना यासंबंधी विनंती केली असून त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. तर लॉकडाऊन जाहीर होताच मुंबईच्या के. के. करिअर सोलुशन या प्लेसमेंट एजन्सीने आपली जबाबदारी झटकली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.