ETV Bharat / state

पुरामुळे गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख 16 मार्ग बंद; देसाईगंज तालुक्यात विक्रमी २१२ मिलीमीटर पाऊस

author img

By

Published : Sep 6, 2019, 1:27 PM IST

जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 77.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक नदी-नाल्यांना पूर आला असून 16 प्रमुख मार्ग सध्या बंद आहेत. यातील देसाईगंज तालुक्यात सर्वाधिक 212 मिलिमीटर पाऊस झाला आहे.

पुरामुळे गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख 16 मार्ग बंद

गडचिरोली - जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 77.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक नदी-नाल्यांना पूर आला असून भामरागड-अल्लापल्ली, आरमोरी-देसाईगंज या मार्गासह 16 प्रमुख मार्ग सध्या बंद आहेत. यावर्षी पावसाने सरासरी ओलांडली आहे. आतापर्यंत तब्बल 118 टक्के पाऊस झाला आहे.

पुरामुळे गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख 16 मार्ग बंद

देसाईगंज तालुक्यात सर्वाधिक 212 मिलीमीटर पाऊस झाला आहे. सलग 3 दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे 4 आणि 5 सप्टेंबरला भामरागडचा संपर्क तुटला होता. काल गुरुवारी पावसाने थोडी उसंत घेतल्याने पर्लकोटा नदीचा पूर ओसरला. त्यानंतर हा मार्ग सुरू करण्यात आला होता. मात्र, काही तास उलटताच आज सकाळी परत एकदा पूर आल्याने भामरागडचा संपर्क तुटला पुन्हा आहे. तर, कुरखेडा-वैरागड, अहेरी-देवलमरी, कमलापूर-रेपनपली, आरमोरी-वडसा, शंकरपूर-बोडदा, फरी-किनाळा, एटापल्ली-आलापल्ली, अहेरी- सिरोंचा, भामरागड-लाहेरी, चातगाव-पेंढरी, मानपूर- पिसेवडदा, कोरची-गोटेकसा, धानोरा- मालेवाडा, चोप-कोरेगाव, हळदी -डोंगरगाव हे 16 मार्ग सध्या बंद आहेत.

Intro:पुरामुळे गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख 16 मार्ग बंद ; देसाईगंज तालुक्यात सर्वाधिक 212 मिलीमीटर पाऊस

गडचिरोली : जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून गेल्या 24 तासात सरासरी 77.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक 212 मिलिमीटर पाऊस देसाईगंज तालुक्यात तालुक्यात झाला. यामुळे जिल्ह्यातील अनेक नदी-नाल्यांना पूर आला असून भामरागड-अल्लापल्ली, आरमोरी-देसाईगंज या प्रमुख मार्गासह 16 मार्ग सध्या बंद पडले आहेत. यावर्षी पावसाने सरासरी ओलांडली असून आतापर्यंत तब्बल 118 टक्के पाऊस झाला आहे.Body:सतत तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे 4 व 5 सप्टेंबरला भामरागडचा संपर्क तुटला होता. काल पावसाने थोडी उसंत घेतल्याने पर्लकोटा नदीचा पूर ओसरला आणि मार्ग सुरू झाला होता. मात्र काही तास उलटत नाही तर आज सकाळी पुन्हा पूर आल्याने भामरागडचा संपर्क तुटला आहे. तर कुरखेडा -वैरागड, अहेरी-देवलमरी, कमलापूर-रेपनपली, आरमोरी-वडसा, शंकरपूर-बोडदा, फरी- किनाळा, एटापल्ली-आलापल्ली, अहेरी- सिरोंचा, भामरागड-लाहेरी, चातगाव-पेंढरी, मानपूर- पिसेवडदा, कोरची-गोटेकसा, धानोरा- मालेवाडा, चोप-कोरेगाव, हळदी -डोंगरगाव हे 16 मार्ग सध्या बंद पडल्याने वाहतूक थांबली आहे.

Conclusion:सोबत व्हिज्युअल आहेत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.