ETV Bharat / state

पोलिसांनी अक्षय शिंदेला ठोकलं अन् एन्काऊंटर विरोधकांचा झाला; आशिष शेलार यांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल - Ashish Shelar On Akshay Shinde

Ashish Shelar On Akshay Shinde Encounter : बदलापूर अत्याचार प्रकरणातील नराधमाचा पोलिसांनी एन्काउंटर केला. मात्र त्यानंतर आता राजकारण चांगलच तापलं आहे. या एन्काऊंटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या विरोधकांना भाजपा नेते आशिष शेलार यांनी चांगलच धारेवर धरलं.

Ashish Shelar On Akshay Shinde Encounter
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 25, 2024, 9:06 AM IST

Updated : Sep 25, 2024, 5:31 PM IST

मुंबई Ashish Shelar On Akshay Shinde Encounter : बदलापूर अत्याचार प्रकरणातील नराधम अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. या प्रकरणी आता विरोधकांनी सरकारवर मोठी टीका केली आहे. दुसरीकडे, "अक्षय शिंदेला पोलिसांनी ठोकलं पण एन्काऊंटर विरोधकांचा झाला. त्यामुळे कालपासून त्यांची आणि त्यांच्या पिलावळीची वक्तव्यं पाहिली तर हा बेशरमपणा आहे, हे लक्षात येईल." अशी घणाघाती टीका मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली.

अक्षय शिंदेची पण बरसी करणार का? : "अफजल गुरुची बरसी करता, तशी आता अक्षय शिंदेची पण बरसी करणार का? असा थेट सवाल आशिष शेलार यांनी यावेळी विचारला. ते पुढं म्हणाले की, विरोधकांची काय वक्तव्यं आहेत? काय सांगत आहात? काय संदेश आहे? काय अर्थ काढायचा? थोडा अभ्यास करून बोला. एवढा थयथयाट कशासाठी करताय? काय सांगायचं आहे तुम्हाला? पोलिसांनी गोळ्या खायच्या काय? त्या पीडित मुलीची मानसिकता तरी समजून घ्या. त्यांनी दिलेल्या पुराव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात? तर मग त्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराबाबत, तो झाला की नाही? पोलिसांनी काही नाही केले? या सर्व गोष्टींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचे आहे काय? कुठल्या थराला गेला तुम्ही? याचं राजकारण करता की तो अक्षय शिंदे, गुन्हेगार तो लिंगपिसाट त्याची माळ जपत आहात?," असे थेट सवाल करत तो लिंगपिपासू आणि हे सत्तापिसासू, अशी जहरी टीकाही आशिष शेलार यांनी यावेळी केली.

पोलिसांनी अक्षय शिंदेला ठोकलं अन् एन्काऊंटर विरोधकांचा झाला; आशिष शेलार यांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल (Reporter)

पोलिसांनी भजन करायचं का? : "शरद पवार काय बोलत आहात? हलगर्जीपणा? आरोपीनं पोलिसांवर हात टाकल्यावर काय त्यांनी भजन करायचं का? पोलिसांच्या बंदुकीवर जो हात घालेल, त्याला ठोकायलाच पाहिजे. आम्ही पूर्णपणे पोलिसांच्या पाठीशी आहोत. उबाठा गट आता ज्या अधिकाऱ्यांनी आरोपीला ठोकलं त्या अधिकाऱ्याला आता काय जोडे मारो करणार काय?," असा खोचक सवाल ही त्यांनी केला. "महाविकास आघाडीला सवयच लागली आहे, आतंकवादी, गुन्हेगार असेल, त्याला ठोकला की त्याचे फोटो घ्यायचे आणि गळा काढायचा. अफझल गुरुची बरसी केलीत, उद्या अक्षय शिंदेची बरसी करतील."

विरोधकांवर शहरी नक्षलवादाचा प्रभाव : "त्या नराधमाविरोधात बोलताना का जीभ अडकत आहे यांची? आदित्य ठाकरे आज ट्विट करत आहेत. मग त्यांच्याकडं माहिती होती, तर ते पोलिसांत का गेले नाहीत? त्यांनी हे कर्तव्य का नाही केलं? नागरिक म्हणून चिमुकलीला न्याय मिळावा म्हणून ते पोलिसांकडं का गेले नाहीत? विरोधकांवर शहरी नक्षलवादाचा प्रभाव आहे, त्यांच्यासाठी ईडी चुकीची, पंतप्रधान आणि मुख्यमंत्री पद चुकीचं, वातावरण असं निर्माण करायचं की या देशात कायदाच नाही. अक्षय शिंदेनं बंदुक घेतली तर या पोलिसांनी काय करायचं होतं? बरं ज्याला ठोकला तो कोण आहे? चिमुरडीसोबत प्रकार केला, त्या कुटुंबाची काय मानसिक अवस्था असेल? आज ते सगळे खोटं ठरवताय?," असा सवालही आशिष शेलार यांनी केला आहे.

हेही वाचा :

  1. अक्षय शिंदेच्या वडिलांची मुंबई उच्च न्यायालयात धाव, पुरावे नष्ट करण्यासाठी बनावट एन्काउन्टर केल्याचा आरोप - badlapur akshay shinde encounter
  2. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी चौकशीचा ससेमिरा; पोलिसांची झाली अडचण - Akshay Shinde Encounter Case
  3. बदलापूर घटनेतील आरोपीच्या एन्काऊंटरवर उदयनराजे म्हणाले; "गोळ्या घालून मारण्यापेक्षा...." - Akshay Shinde Encounter

Last Updated : Sep 25, 2024, 5:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.