धुळे - भिडवले गगनाला भाव, मोदी सरकार त्याचे नाव, यासह विविध घोषणाबाजी करत महिला काँग्रेस कमिटीने आज सकाळी दक्षता पोलीस पेट्रोल पंपाजवळ आंदोलन केले. यावेळी पेट्रोल, डिझेल, गॅससह खाद्य तेलाच्या किमती कमी करण्याची मागणी करण्यात आली. काँग्रेसतर्फे खा. राहुल गांधी यांचा वाढदिवस हा संकल्प दिन म्हणून साजरा केला जात आहे. यानिमित्त महिला काँग्रेस कमिटीने वाढत्या महागाईविरोधात आंदोलन करुन राहुल गांधी यांचे सरकार आणण्याचा संकल्प केला. 'राहुलजी को लाओ, देश बचाओ' असा नारा देत यावेळी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
महिला आंदोलक
या आंदोलनात जिल्हाध्यक्षा गायत्री जयस्वाल, शहराध्यक्षा वानुबाई शिरसाठ, नाजनिन शेख, सुशिला ठाकरे, सुमन मराठे, छाया ठाकरे, शिवाबाई ठाकरे, ममता पाटील, बबीता ठाकरे, अनिता शिंदे, कल्पना गुरव, ज्योती सोनवणे, शहनाज अन्सारी, संगीता सोनवणे, आशा सोनवणे, अनिता गिरासे, रत्ना साळुंखे आदी महिला पदाधिकारी सहभागी झाल्या होत्या.