ETV Bharat / state

Nandurbar Election : मतदार राजा कोणाच्या पारड्यात देणार आपल्या मतांचा जोगवा; 149 नंदुरबार ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया सुरू - Voting process for Nandurbar Gram Panchayat begins

नंदुरबार जिल्ह्यातल्या 149 ग्रामपंचायतींच्या मतदानाला ( Voting process for Nandurbar Gram Panchayat begins ) आज सकाळपासुन सुरुवात झाली आहे. नंदुरबार तालुक्यातील 75 आणि शहादा तालुक्यातील 74 ग्रामपंचाचयतींसाठी आज मतदान होत आहे. यातील 12 ग्रामपंचायती या बिनविरोध ( 12 Gram Panchayats are unopposed ) झालेल्या आहेत. जिल्ह्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर चुरस निर्माण झाली आहे.

Nandurbar Election
नंदुरबार मतदान
author img

By

Published : Sep 18, 2022, 10:19 AM IST

Updated : Sep 18, 2022, 10:46 AM IST

नंदुरबार - जिल्ह्यातल्या 149 ग्रामपंचायतींच्या मतदानाला आज सकाळपासुन सुरुवात झाली आहे ( Voting process for Nandurbar Gram Panchayat begins ). नंदुरबार तालुक्यातील 75 आणि शहादा तालुक्यातील 74 ग्रामपंचाचयतींसाठी आज मतदान होत आहे. यातील 12 ग्रामपंचायती या बिनविरोध झालेल्या आहेत. 149 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी 506 उमेदवार रिंगणात उभे ठाकले आहेत. तर सदस्य पदासाठी 2949 उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी 2450 अधिकारी कर्मचारी आणि पोलीसांची नेमणुक करण्यात आली आहे. या मतदान प्रक्रीयेसाठी 462 मतदान केंद्र देखील तयार करण्यात आले आहे. सकाळ पासुन धिम्या गतीने मतदान प्रक्रीया सुरु असल्याचे चित्र सकाळच्या सत्रात दिसुन आले.

नंदुरबार मतदान

506 सरपंच उमेदवार रिंगणात : नंदुरबार जिल्ह्यात 149 ग्रामपंचायतींच्या सरपंचा पदासाठी 172 जणांनी माघार घेतली असल्याने आता 506 उमेदवार सरपंचपदासाठी रिंगणात उभे ठाकले आहेत. तर सदस्य पदासाठी 507 जणांनी माघारी घेतली आहे. त्यामुळे आता सदस्यपदासाठी 2949 उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. नंदुरबार आणि शहादा तालुक्यात मोठ्या प्रमाणात होवु घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांनी राजकीय धुराळा उडणार असल्याच चित्र माघारीनंतर दिसुन येत.

निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज : नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार व शहादा तालुक्यात एकूण 149 ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. याकरिता शहाद्यात 243 तर नंदुरबार येथे 219 मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. याकरिता शहादा येथे 1400 कर्मचारी व नंदुरबार येथे 1050 मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आली आहेत.

पोलीस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त : जिल्ह्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर चुरस ( 12 Gram Panchayats are unopposed ) निर्माण झाली आहे. याकरिता पोलीस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यासाठी जिल्ह्यात दोन उपविभागीय पोलिस अधिकारी, 8 पोलीस निरीक्षक, 38 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 595 पोलीस कर्मचारी व 450 होमगार्ड यांच्यासह एक एसआरपीएफ ची तुकडी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहे.

शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात काट्याची टक्कर : सकाळी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून ग्रामीण भागात या निवडणुकीत मोठी चुरस पाहण्यास मिळत आहे. काही ठिकाणी सकाळपासूनच मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. काही ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी असा लढती पाहण्यास मिळत आहे. नंदुरबार तालुक्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात काट्याची टक्कर आहे तर शहादा तालुक्यात काँग्रेस आणि भाजप तसेच स्थानिक विकास आघाड्या यांच्यात चुरस पाहण्यास मिळत आहे. मतदार राजा कोणाच्या पारड्यात आपला मतांचा जोगवा देतो आणि ग्रामपंचायत सत्ता कोणत्या पक्षाकडे जाते हे दुसऱ्या दिवशी होणाऱ्या मतमोजणीतच कळणार आहे.

Last Updated : Sep 18, 2022, 10:46 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.